सायंकाळचे कार्यक्रम

अष्टक

(१) गुरु सखाराम कोठे राहातो । पुसाल तुम्ही तरी मीच सागतो । संसार घाटा उतरून जावे स्वर्गादि कल्याण तरी तरावे || १|| ज्ञानभिमानेचि भुवंडी आली । ती टाळूनी उत्तर दिङ न्यहाळी। गव्यूतिपारि गुरुराज राहे। श्रीराम-नाम ध्वनि गर्जताहे।। २।। त्या स्थानभूमीसी कवाड नांव । समीप त्या सर्व आनंद गांव । गुरुकृपे पाहूनि तृप्त झालो मी टाकूनि तत्पदीलीन झालो ।। ३।। श्रीसच्चिदात्मा सखारामबाबा । नमूनि तुम्ही स्वसुखासि पावा । देहाभिमानासि सांडूनि पहा । तुम्ही सखाराम स्वयेची आहा।। ४ ।। मेटी गुरुची सहजचि आहे। तुटी कदा ब्रहा श्रुती न साहे ।।५।। हे सत्य लोकांसी दावूनि बोधे । स्वये ब्रद्धा आकार टाकुनी साधे । श्रीसदगुरु ब्रह्म कसा न माना । तृप्तीविणे व्यर्थ जसा तनाना ।। ६।। तुम्ही न माना तरी सत्य ब्रह्म । माना तरी व्हाल तुम्हीच ब्रह्म ब्रह्मासी ब्रह्म महणण्याविण तेचि सत्य । मनाविणे चिद्घन नाही कृत्य ।। ७।। सर्वात्मक ब्रहागुरुच राम । ऐक्ये सदाष्टांग तया नमाम हे अष्टक श्री सखाराम पायी दासे अर्पीले रामकृष्णा भिदायी ।। ८।।

जय जय रघुवीर समर्थ

भुवनगुप्तये ब्रह्मणार्थितं । दशरथालये व्यक्ति मागतं । जनकनंदीनी लक्ष्मणान्वितं भज मनः सदा राममद्भूतं ।। १।। कमललोचन पापमनंचन स्वजनरंजनं । दैत्यभजनं । षडरिमर्दनं बोधकांन भज मनः सदा राममद्भूतं ।। २।। अमरकिनरै: सिध्दिचारणैर्मुनिवरैर्नरैरप्सरोणै: । परमविद्यया स्व स्वयार्चितं भज मनः सदा राममद्भूतं ।। ३।। सुरपतिस्त्ययोध्यापुरे वरे सुर तरुस्थले मडपांतरे । मणिमयासने सम्यगास्थितं भज मनः सदा राममद्भूतं ।। ४ निजतनुप्रभा भूषिताखिलं ज्वलितरत्नयु दिव्यकुंडलं । पदविराजितं क्षोणिमंडल भज मनः सदा राममद्भूतं ।। ५।। अगिणौजसं दंडसागरं प्रणततापसं साधुमानसं । अभितभाससं पीतवाससं भज मनः सदा राममद्भूतं ।। ६ ।। चरितविस्तरं कोटिभाषितं शत्रूभजनं नामसंस्थितं । जपति शंकरो नामनिश्चितं भज मनः सदा राममद्भूतं ।। ७।। मदनकोटि सौदर्यमोहन परमभिक्तदं कामदोहन हृदयपंकजे ध्यात्मभावनं भज मनः सदा राममद्भूतं ।। ८ ।। एवमद्भुतं राघवाष्टकं प्रतिदिनं पठेत् भक्तिपूर्वकं । अहिरिवत्वचं पापकंचूकं विहरणं लभेज्ज्योतिरात्मकं भज मनः सदा राममद्भूतं ।। ९।।

जय जय रघुवीर समर्थ ।

(३) सुंदरानना पिंगलोचना दुष्टभंजना विश्वरंजना । भुमिआत्मजा शोकनाशना हे दयानिधे वायुनंदना ।। १।। लोकवंदना दैत्यकंदना गुणचंदना वारि बंधना । काममर्दना तू जनार्दना हे दयानिधे वायुनंदना ।। २।। भक्तिवल्लभा देवदुर्लभा चित्त-सुलभा जीवजीवना । पाव पावना हेची भावना हे दयानिधे वायुनंदना ।। ३।। ज्वरध्वंसना वातनाशना कफनि कृतना सीतशांतना । राम भेटवी नाम कीर्तना हे दयानिधे वायुनंदना ।। ४ ।। राम चोरिले या महातळी धावला त्वरे मारुती बळी । सोडवी बळी जगज्जीवना हे दयानिधे वायुनंदना ।। ५।। जाहला ऋणी स्वामी तो रणी द्रोण आणुनि उठवी फणी कीर्तिघोष हा ठाऊका जना हे दयानिधे वायुनंदना. ।। ६ ।। रंगली मदे कामकर्दमी ना घडे तुझी भक्ति सप्तमी । चातकापरी मी कृपाघना हे दयानिधे वायुनंदना ।। ७।। शीण वाटतो अंतरी सदा धावरे प्रभो वारि आपदा । तप्त मी बहु शांतवी मना हे दयानिधे वायुनंदना ।। ८।। भीम अष्टक वाचिता नरु अक्षई तया भीम दे वरु साक्ष बाणली राघव मना हे दयानिधे वायुनंदना ।। १० ।। जय रघुवीर समर्थ ।

(४) श्रीरामदास स्वामींचे अष्टक

शुकासारिखे पूर्ण वैराग्य ज्याचे ।। वसिष्ठापरी ज्ञान अद्भूतसाचे कवी वाल्मिका सारिखा मान्य ऐसा नमस्कार माझा गुरु रामदासा ।।१।। उपदेश झाला असे राघवाचा ।। श्रवणी जसा गुण परिक्षितीचा ।। विवेके विराजे जगी पूर्ण ठसा ।। नमस्कार माझा गुरु रामदासा ।। २।। करी किर्तन नारादासारीखेची कदर्युपरी शांती ज्याची सुखाची जया वाटतो कांचन केर जैसा ।। नमस्कार माझा गुरु रामदासा ।। ३ ।। स्मरणी जसा शंकर प्रल्हाद चकोरा परी आठवी रामचंद्र ।। चकोरापरी आठवी रामचंद्र ।। रमा सेवी पदांबुजी जाण जैसा । नमस्कार माझा गुरु रामदासा ।।४।। पृथूरिखा अर्चनी वाट पाहे ।। खरा अक्रुराचा शम वंदिता हे ।। नसे गर्व काही अणुमात्र जैसा ।। नमस्कार माझा गुरु रामदासा.।। ५।। खरी भक्ति त्याहों जगी मारुतीची ।। असे रामदास्य जगी मारुतीची ।। नसे भेद दोघां जळी गार जैसा ।। नमस्कार माझा गुरु रामदासा ।। ६ ।। जेणे अर्जुनासारिखे सख्य केले ।। मुलीहूनिया व्दैत निःशेष गेले ।। सितानायका दृढ केला कुवासा ।। नमस्कार माझा गुरु रामदासा ।। ७।। बळी आत्मनिवेदनी पूर्ण झाला ।। विदेहीपणे दास तैसा मिळाला ।। म्हणे उध्दव सूत वर्णु मी कैसा ।। नमस्कार माझा गुरु रामदासा ।। ८ ।। जय जय रघुवीर समर्थ ।

(५) कलीनाजी तप्त तिन्ही पूर्ण तापे। नसे ज्ञान भक्ति विरक्ति स्वपापे । असा देखुनी लोक आली दया हो। म्हणूनि धरी जो अवतार हाहो ।। १।। कृष्णातिरी पाहुनि क्षेत्रसप्तऋषींचे तसे कुळ शुद्धात्म तृप्त माटे कुळी त्या अवतार घेतो जो पूर्ण आत्मा श्रुती वर्णिजेतो ।।२।। रामकृष्ण नामे जना मुक्ती होय कलीमाजी असा दुजा न उपाय।।३।। असे वेदी नाम कली संत्तारक । जपे धन्य तो तीन कोट्यर्थ लोक ।। ३।। नारदा विरिंची करी उपदेशा । कलीमाजी गाता जिवनमुक्त दशा । जनी रामकृष्ण नाम ज्यांचे प्रसिध्द । फिरे सर्व लोका करी पूर्ण सिध्द ।। ४ ।। जना दर्शने स्पर्शने तारितो हा । तत्पदा न स्मरे असा कोण तो हा। जनाचे सदा क्षमा अपराध । करुनि दिला पूर्णस्वात्माचि बोध ।।५।। जया पाहिजे संसृति बंध नाश ।। तयाने नमावे सद्‌गुरुमुक्तपाश ।। अहो ज्या नरा जाहली पूर्ण सेवा । ते धन्य हो त्या नसे जन्म हेवा ।। ६ ।। स्वधर्म आचार तशीच भक्ति । वैराग्य विज्ञान चतुर्थ मुक्ति ।। जना वाटली जन्म कर्मे हरुनि । त्या नमा काय वाडःमने करुनी ।। ७ ।। जो एकला सर्व भूतांत सर्व । भूतें नासती आसती हाचि भाव ।। भ्रमेविण काही दुजा भाव नाही । म्हणोनी सद्‌गुरुविणे अन्य नाही ।। ८ ।। गुरुसद्‌गुरु देव आत्मा असा हा ज्ञानाज्ञानबंध दुजामोक्ष नोहा ।। हा सर्व अज्ञान विलास जाणा । धरा हृदयी सद्‌गुरु मोक्ष राणा ।। ९ ।। हे अष्टक सद्‌गुरु रामकृष्णे । मुखे बोलविले स्वये तृप्त तृष्णे ।। तयांचे पदी टाकुनी माझे मी तों । आनन्य गोविंद सदा नमीतो ।। १० ।। जयजय रघुवीर समर्थ ।।

(६) गुरु सखाराम परात्पारुहा रामकृष्णनाम परम विदेहा ।। गोविंद संत सद्‌गुरु पहाहा । परांपरा लाधली हीच देहा ।। १।। सत्संग महिमाची जना कळावी । उपासना श्रीगुरु वाढवावी ।। हा भाव जाणूनि धालावलीत । परांजपे व्यक्त हो तो कुळात ।। २।। रामकृष्ण नामे परम समर्थ । गोविंद कल्याण दिसे जनांत ।। कर्तव्य कांही उरलेची नाही। यात्रादि कर्मे गुर्वर्थ पाही ।। ३ ।। कर्मे करुनी स्वउपासनेला । बोधे करी तृप्त महाजनाला । यथाधिकारे उपदेशी दीना । हा गुहय भावार्थ असेची जाणा ।। ४ ।। जो वर्ततो नित्य स्वयंप्रकाशे । अधिष्ठान सर्वांतरि तोची भासे । त्या पाहता पाहता तो उरेना । पहाणेचि ते सद्‌गुरुरूप जाणा ।। ५।। सच्चित्सुखात्मा जरी यास बोलू । पदत्रयाचाचि विवर्त खेळू। क्षराक्षरा ठाव जेथे असेना । पुरुषोत्तम श्री गुरु नित्य जाणा ।। ६।। अस्तिती नास्तीति पदासी एक । अधिष्ठान जो सर्व पाहोनी लोक। व्यतिरेक दृष्ट्या मिथ्या जगाते । जाणोनि नेणोनि चिदेव वर्ते ।।७।। स्वभक्तगामी आनंद व्याख्या । निरुपणे बोधुनि देई सौख्या। चतुर्दशी पौष कृष्ण तिथीला । वंदूनि भावे स्वगुरुपदाला । निर्वाण केले क्षेत्रांत काशी। सहज स्थितीने स्वगुरु पदासी । ही पद्य माला गोविंद याने । वदविली गोविंदमुखे कृपेने ।। ८ ।। जय जय रघुवीर समर्थ ।।

(७) कलौ युगे जनिष्यमाणमंदबुद्धीमानवान् । निमज्जतो भवांबुधौ विलोक्य योऽनुकंपया ।। मरुत्सुतो नृदेहधृक बभूव बव्हृचांकुले । गुरो नमामि रामदासपादपंकज तव ।। १।। निजे विवाहसंभ्रमे द्विजेंद्रवक्त्रानिः सृतं । वचो निशम्य सावधान सावधान इत्यथ ।। विमुच्य पाशबंधनंवनं जगाम तत्क्षणं ।। गुरो नमामि रामदासपादपंकज तव ।। २।। विशुध्दत्बुधनित्यमुक्तचिद्धनोऽपि यः स्वयं । विरक्ति भक्तिसत्प्रबोधसत्पथप्रवृतये । मुदाचकार रामचंद्रपादपद्य सेवनं ।। गुरो नमामि रामदासपादपंकज तव ।। ३।। निज प्रतापसत्प्रदीपसंप्रकाशवारित ।। स्वभक्तहृत्समुल्लसन्महाविमोहसंततेः ।। प्रचंडदुष्टदुर्विनीतनास्तिकक्षय क्षमं ।। गुरो नमामि रामदासपादपंकज तव ।। ४।। यदियहृग्दतां रतिं विलोक्य विव्हलः स्वयं । प्रभुर्धू तेषुचापपाणिरच्युतो रघुद्वहः ।। तथैव रुक्मिणी बभूवजानकी समाकृर्तिः ।। गुरो नमामि रामदासपादपंकज तव ।। ५ ।। यदियवक्त्रनिर्गलत्सु वर्ण पट्टिकान्वितं । मन प्रबोधदासबोधनामकं तरिद्वय ।। भवबुधिंतितीर्षुणा जनेन सेव्यतेंऽजसा ।। गुरो नमामि रामदासपादपंकज तव ।। ६।। असत्पदार्थरागिणीमभीष्टकामपूरकं । परंपरदं प्रत्सितां यदं तरंगसाधनं । सदद्वितीम निर्विकारनित्यचिद्रसल्पूतं ।। गुरो नमामि रामदासपादपंकज तव ।। ७।। त्रिलोकमोहनंस्फुरन मनोजगर्वखंडनं । क्षमं चचार दुश्चरं तपः शमादिजव्रतं ।। यशश्रीया मनोज्ञया प्रपूरयन्जगत् त्रयं ।। गुरो नमामि रामदासपादपंकज तव ।। ८ ।। त्वमेव में पितामहः पिता त्वमेव सदगुरो । त्वमेवमेसुहृत्कुल त्वमेव वर्ण आश्रमः ।। त्वमेवधाम भूषणं त्वमेव दैवतं परं । कृपाकटाक्ष विभ्रमेण शंकर विलोकयऽ ।। गुरो नमामि रामदासपादपंकज तव ।। ९।।

श्रीसदगुरु रामदास स्वामी समर्थाष्टकं संपूर्ण श्रीसदगुरु सीतारामचंद्रार्पणमस्तु । जय जय रघुवीर समर्थ ।

श्री रामसमर्थ

सकामान कामान प्रकामं फलैस्तैर्नकामै र्हतोयः स्वयंपूरयिष्यान् । कवाडे परब्रह्मणो व्दारभूते स्थितं तं सखाराम रामं नमामि ।। १।। शिशुत्वेऽपिवृत्धत्वऽमापन्नवद्यो । धियाऽपास्य सर्वान्हृषीकैकभोग्यान ।। स्मरन्केशवं बेवली ग्राम संस्थं । श्रिया श्लिष्टमष्टारचक्रं विजिग्ये ।। २ ।। स्वयं ब्रह्मचारी परंतातबंध्वो। र्वधूस्पृष्टहस्तोऽति निर्बंधयोगात् क्वचित्कालमासाद्य गार्हस्थशब्दं प्रतस्थे ततः स्वात्मलाभायधीमान् ।। ३।। भजन् व्दादशाब्दैर्हरे र्ध्यानयोगं। तथानाम संकीर्तनासक्तवृत्तिः अथोब्रह्मवादे ततोराज योगे विभक्ता युरेनं न कोवा भजेत ।। ४ ।। यशोधर्मवैराग्यविज्ञान सीमं तपःसंपदाश्लेष सौख्यं भजंतम्। भृशंयोगजं भाग्यमापादयंतं गुरूंतं सखाराम रामं नमामि ।। ५।। स्वयं न्यस्त सर्वस्वसन्यासयोगः परंलोकसंग्राहकोज्ञानभाजः ।। विचित्रं चरित्रं पवित्रं यदियं हरितं स्मरामः सखाराममूर्ति ।। ६।। भवेपापभाजामिदानिंतनानां जनानां प्रसादाय कारुण्ययोगात ।। विदेहोमुक्तोऽपिय: शुद्धमुर्त्या ह्यदी प्रस्फुरत्यंत्ततो भक्तिभाजाम् ।।७।। अचिंत्यंतपोयस्य विज्ञानरूपं विचिंत्यं हृदा यस्य दिव्य स्वरुपं ।। हरे: सद्‌गुरोरूपमेकादशं यत् तमीडयम सखाराम मं भजामः ।। ८11 इतीदमष्टकं श्रीमत्सखारामाख्य सद्‌गुरो चिद्धनस्य प्रसादेन रचितं विष्णु शर्मणा ।। ९।। जय जय रघुवीर समर्थ

सुदुष्कृतां विनाशकं सतां विपद् विमोचकं, ग्रहाण चापसायकोल्लसन मनुष्यदेहकं । इति त्वजार्थनावशाच्चतुर्विधात्मभावकं । भजामी राम नायकं ससीतमिष्टदायकं ।।१।। अनेकरत्नसंचयोल्लसत्किरीट मस्तकं सुदर्पणाच्छदायतेक्षणे सुनासिकं । प्रवाल जिज्वरीष्ठकुद कोरकाल्पदंत्तकं । भजामि ।।३।। जडीकृताब्जकुडमलप्रसाददातृ-हस्तकं सुमृत्तनील चंचूकस्तनोल्लुठत्सुगुच्छकम् ।। विशालवक्ष उन्नतीप्रदापित्तारिशावकं । भजामि ।।४।। सुवृत्तहन्व नुत्तमप्रसाद भावसूचकं । सुपूर्णशारदाब्जभाजयन्मुखाब्ज चंद्रीकं अनुत्तमत्रिरेखवृत्त कंबुकंठनालकं । भजामि ।। ५।। भ्रमामनाभपद्मजांडकोटितुडधारकं । तिरस्कृतप्रमुढसिंह चारुमध्यभूमिकं नवाब्जक्षणाप्रभा सुपीतभास्वदशुकं । भजामि ।। ६ ।। मृदूरदर्शनादवने पलायितोरुहस्तकं । सुजंघजानुवर्णने विसज्ञिताब्जजादिकं । तदंशुम त्पलागणैर्नमस्कृतेष्टपादुकं । भजामि ।। ७ ।। निगूढगुल्फपाद्पार्शनी नंदितात्मसेवकं । सुरत्न चंचदगुलीदुकन्न खेंदुधारकं । सुभक्तसर्वसंपदुत्थकामिभोगकामुकं । भजामि ।।८।। मणिप्रवेक सचिंत स्फुत्करांगुलीयकं । सुवज्र कंकणांगदैरदत्कृतेदुधारकं । विचित्ररत्न मेखलाल्पघंटिंकासुतोषकं । भजामि ।। ९ ।। क्वचित्सखीप्रतारणाय सत्यभावचोरकं । क्वचिच्पुण्यवस्तुलाभदत्तहस्तताकं । क्वचित्सुरंग भूमिकानिपातीतोरुमल्लकं भजामि ।। १० । अयत्नतो वसिष्ठमुख्यगुर्व वात्पविद्यकं । पुरस्कृतेष्टसिध्दिकामकोशिकात्मयाचकं ।। सहाटटहासताटकासुपीडितात्मपाठकम ।।११।। सहोजसाम चेनजातजामदग्निकार्मुकं । तत:सदारकार्यवर्ग बुध्धिपूर्वकारकम् । महेशचापभंगतोऽनुलब्ध भूमिकन्यकं । भजामि ।। १२।। सुवृत्तपंचचामरारात्तपत्रकारदर्शकं । जयप्रदं जगन्मयं जनुर्मृती प्रणाशकं । अहत्वमादिभावहीन पूर्णसच्च्दिात्मकं । भजामि 11१३11

कृतमिति शिशुलीलं स्तोत्र मेतदपठेद्यः शिशुसुखद मतो न प्राज्ञसंतोषकारि । तदपि शिशुगणानां बालरामः सखा नो भवतु मदपशब्दै स्तोत्रगैः संप्रहृष्टः ।

श्री राघवेंद्र स्वामीचे अष्टक

१०

माटे कुळी घेऊन देह रम्य ।। वागे हरी नाम कवि प्रसौम्य । वनीश्रमे सेवित रामचंद्रा ।। तारी मला सद्‌गुरु राघवेंद्रा ।। १।। हरीराम बावासि सेवूनि वेगे ।। श्रीरामचंद्रार्थ पंथासी लागे । मल्हारी श्रोते दिले रामचंद्रा ।। तारी मला सद्‌गुरु राघवेंद्रा ।। २।। घेऊनिया राम घरासि आला ।। त्यापासुनि वास घरीच केल। माता पिता तारियले सुचारा ।। तारी मला सद्‌गुरु राघवेंद्रा ।। ३।। नाथापरी वाढपी शांती अंगी । दयाक्षमा भक्ति वैराग्य भोगी ।। सर्वात्म भावे जगी वागणारा । तारी मला सद्‌गुरु राघवेंद्रा ।। ४ ।। श्रीराज राजेंद्र पदाब्ज सेवे ।। अखंड ब्रह्मात्म सुखासि पावे । नित्यक्रमे वाहित बोधमुद्रा ।। तारी मला सद्‌गुरु राघवेंद्रा ।। ५ ।। पुरुषोत्तमा विश्वनाथा शिवाला ।। राजा सख्या त्रिंबक ह्या सहाला। आत्मैक देशी स्वये बंधू तारा ।। तारी मला सद्‌गुरु राघवेंद्रा ।। ६ ।। सखाराम बुवासी लावी स्वधर्मा । स्वये राहुनि साक्षीभूत स्वकर्मा ।। संन्यास धर्म स्वये सारी सारा । तारी मला सद्‌गुरु राघवेंद्रा ।। ७ ।। समाधिस्त झाला शके सप्तसप्त ।। ऋषिभूमि फाल्गुनि अंती स्वतृप्त जडाजिवा लावीत बोधमुदा ।। तारी मला सद्गुरु राघवेंद्रा ।। ८ ।। ह्या सहाव्या बंधुच्या पुवाकाने ।। मी राम कृष्णे पदि अष्टकानें । नमूनिया चिद्घन दोही केंद्रा । तारी मला सद्‌गुरु राघवेंद्रा ।। ९ ।। जय जय रघुवीर समर्थ

श्रीकरुणाष्टकें

अनुदिन अनुतापें तापलों

अनुदिन अनुतापे तापलों रामराया परम दिनदयाळा नीरसी मोहमाया अचपळ मन माझे नावरे आवरीतां तुजविण सिण होतो धांव रे धांव आतां ।। १ ।। भजनरहित रामा सर्वहि जन्म गेला स्वजनजनधनाचा वेर्थ म्यां स्वार्थ केला रघुपति मति माझी आपुलीशी करावी सकळ त्यजुनि भावें कांस तूझी धरावी ।। २ ।। विषयजनित सूखे सौख्य होणार नाहीं तुजविण रघुनाथा वोखटें सर्व कांहीं रविकुळटिळका रे हीत माझें करावें दुरित दुरि हरावें सस्वरुपीं भरावें ।। ३ ।। तनु मनु धनु माझे राघवा रुप तुझें तुजविण मज वाटे सर्व संसार वोझे प्रचलित न करावी सर्वथा बुध्दी माझी अचल भजनलीला लागली आस तुझी ।। ४ ।। चपळपण मनाचे मोडितां मोडवेना सकळस्वजनमाया तोडितां तोडवेना घडि घडि बिघडे हा निश्चयो अंतरींचा म्हणउनि करुणा हे बोलतों दीन वाचा ।। ५ ।। जळत हृदय माझे जन्म कोट्यानकोटी मजवरी करुणेचा राघवा पूर लोटी तळमळ निववी रे राम कारुण्यसिंधु ष‌ड्रिपुकुळ माझें तोडि याचा समंधु ।। ६।। तुजविण करुणा हे कोण जाणेल तुझी सिणत सिणत पोटी पाहीली वाट तुझी झडकरि झड घली धांव पंचानना रे तुजविण मज नेते जंबुकी वासना रे ।। ७ ।। सबळ जनक माझा राम लावण्यपेटी म्हणउनि मज पोटीं लागली आस मोठी दिवस गणित बोटी प्राण ठेवूनि कंठी अवचट मज भेटी होत घालीन मीठी ।। ८ ।।जननिजनकमाया लेकरु काय जाणे पय न लगत मुखें हाणतां वत्स नेणे जळधरकण आशा लागली चातकासी हिमकर अवलोकी पक्षिया भूमिवासी ।। ९ ।।तुजविण मज तैसें जाहलें देवराया विलग विषमकाळी तूटली सर्व माया सकळजनसखा तू स्वामी आणीक नाही विषयवमन जैसे त्यागिले सर्व काही ।। १० ।। स्वजनजनधनाचा कोण संतोष आहे रघुपतिविण आतां चित्त कोठे न राहे जिवलग जिव घेती प्रेत सांडूनि जाती विषय सकळ नेती मागुता जन्म देती ।। ११ ।। सकळ जन भवाचे आखिले वैभवाचे जिवलग मग कैचे चालती हेच साचे विलग विशमकाळी सांडित्ती सर्व माळी रघुविर सुखदाता सोडवी अंतकाळी ।। १२ ।। सुख सुख म्हणतां हे दुःख ठाकूनि आले भजन सकळ गेले चित्त दुश्चीत जाले भ्रमित मन वळेना हीत ते आकळेना परम कठिण देहि देहबुध्दि गळेना ।। १३ ।।

उपरति मज रामी जाहली पूर्णकामी सकळ भ्रमविरामी रामविश्रामधामी घडिघडि मन आतां रामरूपी भरावे रविकुळटिळकारे आपुलेसे करावें ।। १४।।

जळचर जळवासी नेणती त्या जळासी निसिदिन तुझपासी चूकलो गूणरासी भुमिधरनिगमासी वर्णवेना जयासी सकलभुवनवासी भेटि दे रामदासी ।। १५ ।। जय जय रघुवीर समर्थ

२. तुझा दास मी वेर्थ जन्मासि आलों

असंख्यात रे भक्त होऊनि गेले । तिहीं साधनांचे बहुकष्ट केले । नव्हे कार्यकर्ता भुमिभार जालों। तुझा दास मी वेर्थ जन्मासि आलों ।। १ ।। बहु दास ते तापसी तीर्थवासी। गिरीकंदरी भेटि नाही जनासी। स्थिती ऐकतां थोर विस्मित जालो । तुझा दास मी वेर्थ जन्मासि आलों ।। २ ।। सदा प्रेमरासी तया भेटलासि । तुझ्या दर्शने स्पर्शने सौख्यरासी । अहंता मनीं शब्दज्ञाने बुडालों । तुझा दास मी वेर्थ जन्मासि आलों ।। ३।।

तुझे प्रतीचे दास निर्माण जाले। असंभाव्य ते कीर्ति बोलोनि गेले।

बहू धारणा थोर चकीत जालों।तुझा दास मी वेर्थ जन्मासि आलों ।। ४ ।।बहुसाल देवाळये हाटकाचीं। रसाळा कळा लाघवें नाटकाची।पुजा देखतां जाड जीवीं गळालों।तुझा दास मी वेर्थ जन्मासि आलों ।। ५ ।।कितेकी देहे त्यागिले तुजलागी। पुढे जाहले संगतीचे विभागी।देहेदुःख होतांच वेगीं पळालों।तुझा दास मी वेर्थ जन्मासि आलो ।। ६ ।। किती योगमूर्ती किती पुण्यमूर्ती। किती धर्मसंस्थापना अन्नशांती । परस्तावलों कावलो तप्त जालों । तुझा दास मी वेर्थ जन्मासि आलों ।। ७ ।। सदा सर्वदा राम सांडूनि कामी । समर्था तुझे दास आम्ही निकामी । बहू स्वाार्थबुध्दीनं रे कष्टवीलो । तुझा दास मी वेर्थ जन्मासि आलो ।। ८ ।।

३. रामावर भार

नसे भक्ति ना ज्ञान ना ध्यान काही नसे प्रेम हे रामविश्राम नाहीं । असा दीन अज्ञान मी दास तुझा । समर्था जनी घेतला भार माझा ।। १।। रघूनायका जन्मजन्मांतरीचा। अहंभाव छेदूनि टाकी दिनाचा । जनीं बोलती दास या राघवाचा । परी अंतरी लेश नाही तयाचा ।। २।। रघुनायका दीन हाती धरावे। अहंभाव छेदूनिया उध्दरावें । अगूणी तयालागि गूणी करावें । समर्थे भवसागरी ऊतरावे ।। ३।।

किती भार घालू रघुनायकाला। मज कारणे सीण होईल त्याला । दिनानाथ हा संकटी धांव घाली। तयाचेनि हे सर्व काया निवाली ।।४।।

मज कोवसा राम कैवल्यदाता। तयाचेनि हे फीटली सर्व चिंता। समर्था तया काय उत्तीर्ण व्हावें । सदा सर्वदा नाम वाचे म्हणावें ।। ५।।

दिनाचे उणें दीसता लाज कोण्हा । जनी दास दीसे तुझा दैन्यवाणा। सिरी स्वामी तू रामपूर्णप्रतापी । तुझा दास पाहे सदा सीघ्रकोपी।। ६ ।। जय जय रघुवीर समर्थ

४. रघुनायका मागणे हेचि आतां

उदासीन हे वृत्ति जीवी धरावी । अती आदरें सर्व सेवा करावी । सदा प्रीति लागो तुझे गूण गातां । रघूनायका मागणें हेंचि आतां ।। १।।

तुझे रुपडें लोचनी म्यां पहावें । तुझे गूण गातां मनासी रहावें ।

उठो आवडी भक्तिपंथेचि जातां । रघूनायका मागणें हेंचि आतां ।। २।।

मनीं वासना भक्ति तुझी करावी । कृपाळूपणे राघवें पूरवावी । वसावें मज अंतरी नाम घेतां । रघूनायका मागणे हेचि आतां ।। ३।।

सदा सर्वदा योग तुझा घडावा । तुझे कारणी देह माझा पडावा । नुपेक्षी मज गुणवंता अनंता। रघूनायका मागणे हेंचि आतां ।। ४।।

नको द्रव्य दारा नको येरझारा। नको मानसी ज्ञानगर्वे फुगारा ।

सगूणी मज लावि रे भक्तिपंथा । रघूनायका मागणे हेचि आतां ।।५।

भवे व्यापलों प्रीतिछाया करावी । कृपासागरे सर्व चिंता हरावी।

मज संकटी सोडवावें समर्था । रघूनायका मागणे हेचि आतां ।। ६।।

मानी कामना कल्पना ते नसावी । कुबुध्दी कुडी वासना नीरसावी । नको संशयो तोडि संसारवेथा। रघूनायका मागणे हेचि आतां ।। ७।।

समर्थापुढे काय मागों कळेना । दुराशा मनी बैसली हे ढळेना।

पुढे संशयो नीरसी सर्व चिंता । रघूनायका मागणे हेचि आतां ।। ८

ब्रिदाकारणें दीन हाती धरावें। म्हणे दास भक्तासि रे उध्दरावें।

सुटो ब्रीद आम्हांसि सांडूनि जातां । रघूनायका मागणे हेचि आता ।। ९ ।।

५. बुध्दि दे रघुनायका

युक्ति नाहीं बुध्दि नाहीं । विद्या नाहीं विवंचिता । नेणता भक्त मी तुझा । बुध्दि दे रघुनायका ।। १ ।।

मन हे आवरेना की । वासना वावडे सदा ।

कल्पना धांवते सैरा । बुध्दि दे रघुनायका ।। २ ।।

अन्न नाहीं वस्त्र नाहीं । सौख्य नाहीं जनामध्ये ।आश्रयो पाहतां नाहीं । बुध्दि दे रघुनायका ।। ३।।

बोलतां चालतां येना । कार्यभाग कळेचिना ।

बहुत पीडिलों लोकीं । बुध्दि दे रघुनायका ।। ४ ।।

तुझा मी टोणपा झालों । कष्टलों बहुतांपरी ।

सौख्य तें पाहतां नाहीं । बुध्दि दे रघुनायका ।। ५ ।।

नेटकें लिहितां येना । वांचितां चुकतां सदा ।

अर्थ तो सांगतां येना । बुध्दि दे रघुनायका ।। ६ ।।

प्रसंग वेळ तर्केना । सुचेना दीर्घ सूचना ।

मैत्रिकी राखतां येना। बुध्दि दे रघुनायका ।। ७ ।।

संसारी श्लाघ्यता नाहीं । सर्वहि लोक हांसती ।

वीसरु पडतो पोटीं । बुध्दि दे रघुनायका ।। ८ ।।

चित्त दुश्चित होतां हे । ताळतंत्र कळेचिना ।आळसू लागला पाठीं । बुध्दि दे रघुनायका ।। ९ ।।कळेना स्फूर्ति होईना । आपदा लागली बहू ।प्रत्यहीं पोट सोडीना । बुध्दि दे रघुनायका ।। १० ।।संसार नेटका नाहीं । उद्वेग वाटतो जिवीं ।परमार्थ आकळेना की। बुध्दि दे रघुनायका ।। ११ ।।देइना पुर्विना कोण्ही । उगेचि जन हासती ।लौकीक राखितां येना । बुध्दि दे रघुनायका ।। १२।।पीशुणे वाटती सर्वे । कोणीही मजला नसे ।समर्था तू दयासिंधू । बुध्दि दे रघुनायका ।। १३।।उदास वाटतें जीवीं । आतां जावेंकुणीकडे ।तू भक्तवत्सला रामा । बुध्दि दे रघुनायका ।। १४।।कायावाचा मनोभावें । तुझा मी म्हणवीतसे ।हे लाज तुजला माझी । बुध्दि दे रघुनायका ।। १५।।सोडविल्या देवकोटी । भूभार फेडिला बळें ।भक्तासी आश्रयो मोठा । बुध्दि दे रघुनायका ।। १६।।भक्त उदंड तुम्हाला । आम्हाला कोण पूसतें ।ब्रीद हें राखणें आधी । बुध्दि दे रघुनायका ।। १७।।उदंड ऐकिली कीर्ती । पतीतपावना प्रभो ।मी येक रंक निर्बुद्धी । बुध्दि दे रघुनायका ।। १८।।आशा हे लागली मोठी । दयाळूवा दया करीआणिक नलगे कांहीं । बुध्दि दे रघुनायका ।। १९।।रामदास म्हणे माझा । संसार तुज लागला ।संशय वाटतो पोटी । बुध्दि दे रघुनायका

६. श्रीसमर्थांच्या जीवींचे आर्त

समाधान साधुजनाचेनि योगें। परि मागुते दुःख होते वियोगे । घडीने घडी सीण अत्यंत वाटे। उदासीन हा काळ कोठे न कंठे ।। १।।

घरै सुंदरे सौख्य नानापरीचे। परी कोण जाणेल ते अंतरीचे । मनी आठवीतांचि तो कंठ दाटे। उदासीन हा काळ कोठे न कंठे ।। २।।

बळे लावितां चित्त कोठें जडेना। समाधान ते काहिँ केल्या घडेना। नव्हे धीर नैनी सदा नीर लोटे। उदासीन हा काळ कोठे न कंठे ।। ३।।

अवस्था मनीं लागली काय सांगो। गुणी गुंतला हेत कोण्हासी मागो बहुसाल भेटावया प्राण फूटे। उदासीन हा काळ कोठे न कंठे ।। ४।।

कृपाळूपणे भेट रे रामराया। वियोगें तुझ्या सर्व व्याकुळ काया । जनांमाजि लौकीक हाही न सूटे। उदासीन हा काळ कोठे न कंठे ।।५।।आहा रे विधी त्वां असे काय केलें। पराधीनता पाप नाझे उदेलें ।बहुतांमधे चूकतां तूक तूटें । उदासीन हा काळ कोठे न कंठे ।। ६ ।।समर्था मनी सांडि नाझी नसावी। सदा सर्वदा भक्तचिंता असावी।घडेना तुझा योग हा प्राप्त कोठें। उदासीन हा काळ कोठे न कंठे ।। ७ ।।अखंडीत हे सांग सेवा घडावी। न होतां तुझी भेटि काया पडावी दिसेदीस आयुष्य हे वेर्थ आटे। उदासीन हा काळ कोठे न कंठे ।। ८।।भजों काय सर्वापरी हीण देवा । करूं काय रे सर्व माझाचि ठेवा ।म्हणों काय मी कर्मरेखा न लोटे । उदासीन हा काळ कोठे न कंठे ।। १।। म्हणे दास मी वास पाहें दयाळा । रघुनायका भक्तपाळा भुपाळा। पहावे तुला हे जिची आर्त मोठे। उदासीन हा काळ कोठे न कंठे ।। १०।।

७. पडलेलें कोडे

उदासीन हा काळ जातो गमेना। सदा सर्वदा थोर चिंता शमेना। उठे मानसी सर्व सांडूनि जाये। रघूनायका काय कैसे करावें ।। १।।जनीं बोलता चालतां वीट वाटे। नसे अंतरी स्वस्थ कोठें न कंठे घडीने घडी चित्त कीती धरावे। रघूनायका काय कैसे करावें।। २।।अवस्था मनीं होय नाना परीची। किती काय सांगो गती अंतरींची ।विवेकेंचि या मानसा आवरावें। रघूनायका काय कैसें करावे ।। ३।।विचारे तन्ही अंतरी कोंड होतो । शरीरासि तो हेत सांडूनि जातो ।उपाधीस देखोनि वाटे सरावे। रघूनायका काय कैसें करावें ।। ४।।म्हणे दास ऊदास जालो दयाळा । जनी वेर्थ संसार हा वायचाळा ।तुझा मी तुला पूसतों सर्वभावें । रघूनायका काय कैसें करावें ।। ५ ।।८. तुजविण रामा मज कंठवेना तुझिया वियोगे जीवित्व आलें। शरीरपांगे बहु दुःख जाले । अज्ञान दारिद्रय माझे सरेना। तुजविण रामा मज कंठवेना ।। १।। परतंत्र जीणें कंठू किती रे। उच्चाट माझे मनी वाटतो रे । लल्लाटरेखा जपि पालटेना । तुजविण रामा मज कंठवेना ।। २।। जडली उपाधी अभिमान साधी । विवेक नाही बहुसाल बाधी । स्वामीवियोगे पळहि गमेना। तुजविण रामा मज कंठवेना ।। ३।। विश्रांति देही अणुमात्र नाही। कुळाभिमानें पडिलों प्रवाहीं । स्वहीत माझे होतां दिसेना । तुजविण रामा मज कंठवेना ।। ४ ।। विषयी जनाने मज लाजविले। प्रपचसंगे आयुष्य गेलें। समयी बहु क्रोध शांती घडेना। तुजविण रामा मज कंठवेना ।। ५ ।। सुदृढ जाली देहबुध्दि देही । वैराग्य काही होणार नाही । अपूर्ण कामी मन हे विटेना । तुजविण रामा मज कंठवेना ।। ६ ।। निरुपणी हे सदवृत्ति होते। स्थळ त्याग होता सवेचि जाते । काये करु रे क्रीया घडेना। तुजविण रामा मज कंठवेना ।। ७ ।। संसारसंगे बहु पीडलो रे। कारुण्य सिंधू मज सोडवी रे । कृपाकटाक्षे सांभाळि दीना। तुजविण रामा मज कंठवेना ।। ८।।जय जी दयाळा त्रैलोक्यपाळा । भवसिंधू हा रे मज तारि हेळा । धारिष्ट माझे हृदयीं वसेना। तुजविण रामा मज कंठवेना ।। ९ ।।आम्हां अनाथा तू एक दाता। संसार वेथा चुकवी समर्था । दासां मनीं आठव वीसरेना। तुजविण रामा मज कंठवेना ।। १० ।।तुझा भाट मी वर्णितो रामराया ।। सदासर्वदा गाय ब्रीदें सवाया ।। महाराज दे अंगिचें वस्त्र आतां ।। बहू जीर्ण झाली देहबुध्दीकथा ।।

(अष्टके झाल्यावर काठ्या चवर्या घेऊन देवासमोर उभे राहून सवायांना प्रारंभ करावा)

सवाई गणपतीची

।। वंदिला गजवदन सुख सुखाचें सदन जेणें जाळीला मदन त्यांचे अंतर धरा ।। अहो रामनाम जनसज्जनविश्राम साधकाचें निजधाम स्वहित आपुलें करा ।। अखंडीत निजध्यास धरा अंतरी हव्यास बोले भागवतीव्यास हरी भजनें तरा ।। धीर उदार सुंदर कीर्ती जाणतसे हर बोलविले सुरवर वरदायक खरा ।। म्हणावा जयजयराम 11311

सवाई मारुतीची

रामदूत वायुसूत भीमगर्भ जुत्पती जो-नरात वानरात भक्तिप्रेमवित्पत्ति।। दास दक्ष स्वामीपक्ष निजकाज सारथी। वीरजोर-शिरजोर धक्क धिंग मारुती ।। म्हणावा जयजयराम ।।

सवाई शंकराची

धन्य कैलासभुवन शुभ्रशंकराचे ध्यान पुढे नाचे गजानन सिंहासनी बैसला ।। वाचे उच्चारितां हर त्यासीं देतो महावर करी पातके संहारअंकी गिरिजा शोभला ।। कृष्णा गोदा भागीरथी ज्याच्या जटेंतुनी निघती ।। पावन त्या त्रिजगतीं स्नानपाना लाधल्या ।। भैरवादिसमुदाय रामनाम नित्य गाय ।। भव भय सर्व जाय लक्ष पायी ठेविल्या ।। म्हणावा जयजयराम ।। २।।

सवाई रामाची

नाम श्रीरामसुंदर ध्याती उमामहेश्वर सिंहासनी रघुविर अंकी सीता शोभला ।। लक्ष्मण महावीर भरतशत्रुघ्न धीर, हनुमंत जोडोनि कर देवत्रऋषी गाइला ।। ज्याचे ध्यानी रामदास त्याचें ध्यान कल्याणास बंधू दत्तात्रेयास रामप्रेमा लाधला ।। वर्णू राघवाचे यश श्रीगुरुचा नामघोष पूर्वपुण्यहि विशेष लक्ष पायी ठेविल्या ।। ४ ।। म्हणावा जयजयराम ।।

शिवहामानसी राम तो हा दशरथी राम जनीवनी पूर्णकाम मध्यभागी शोभतो ।। दासनवमीची घमंड

यात्रा मिळतसे उदंड ।। तेथे होतसे प्रचंड धिंग फार गाजतो ।। मिळताती साधुजन कथा होतसे गहन ।। तेथे वाटे समाधान नयनासी पारणे ।। धन्य हटाळे सुग्राम तेथे माझा राजाराम त्र्यंबकेशी पूर्णकाम ।। रामनाम बोलणे म्हणावा जयजयराम ।।

सवाई चिदघन स्वामींची

चिदघने शरण रामकृष्ण त्याचे चरण धरुनी आपण स्वर्ये जाऊनी अहंस्फुरण तद्रूप झाला ।। केवळ जनदृष्ट्या देह राहिला ।। तेणेची प्रभाव वर्तीला तेणे योगे सहज जनाचा भ्रम नष्टविला ।। तयासी ज्याचा विश्वास त्याची चिंता असे त्यास तेणेयोगे भवपाश आपोआप तुटतसे ।। असा सद्‌गुरु गोविंद मातापिता करी घेऊन विठ्ठल सुतासी सन्मार्गा लावून आपण स्वये वर्ततसे ।। ६ ।। म्हणावा जयजयराम ।।

सवाई मारुतीची

जब हनुमंत जनकदुहिता शुध्द लेनेंकु गगनसे गभर दौर दौर आये है ।। तब कंठ गुरगुरीत नेत्र गरगरगरीत ।। रोम थरथरथरीत पुच्छ झारे ।। तब लंका घरघरघरीत बनमो दरदरदरीत सीतशोक हरत झरझरझरीत बन उभारे ।। तब कंठ कुचकुच कुचीत इंद्रजीत चकचकचकीत रावन थकथकथकीत कर नगर जार जार मखमखमखीत हेम लखलखलखीत दास लियो जयतुराम मिले तब कपि भुभुक्कारे ।। म्हणावा जयजय राम।।७।।

जोहार

परम सुंदर रूप शामल ।। इंद्रनील किल कांतीकोमल ।। भयनिवारण भक्तवत्सल ।। वरपराक्रम कीर्तीवीमल ।। भुवनकंटक दैत्यमारक ।। अमरमोचक दैन्यहारक ।। दुरितनाशन पुण्यकारक ।। हरित संकट दासतारक ।। विकट वीषम तालछेदक ।। वर अनावर दैत्यभेदक ।। दशमुखादिक शिरच्छेदक ।। ऋषिमुनिजनचित्तवेधक ।। अमरभूषण उत्तमोत्तम ।। भुवनपालक हा रघुत्तम ।। वीरवीरांतक हा विरोत्तम ।। असुरांतक हा सुरोत्तम ।। बहूत पीडक दैत्यभंजन ।। ऋषीमुनीजनयोगीरंजन ।। दुरित दानव दुष्ट गंजन ।। अतुल कीर्ती व्यक्त व्यजन ।। जय जय मार्तंडवंशावतंस ।। जयजय कैवल्यधाम ।। जयजय भरताग्रज ।। जयजय सीतारमण । जयजय सिंहासनाधीश्वर।। जयजय सुरराज विराजितपद ।। नमस्ते नमस्ते सीताकांत स्मरण जयजयराम ।।

श्लोक

तुझा भिक्षुकु दातया रामचंद्रा । सदास्वस्ति चिंतीत सेवा महेंद्रा । प्रजाधीश देशावरा पूर्ण द्यावे । भवदैन्य हे देशधडी करावे । जयजय रघुवीर समर्थ ।।