यापुढील कार्यक्रम सकाळी १० ते ११ चे दरम्यान
भजन :- जयजय राम राम राम । सीताराम राम राम ।।
१
रामा हो जय रामा हो ।। पतीतपावन पूर्णकामा हो ।। ।। नाथा हो दिननाथा हो । तुझिया चरणी राहो माथा हो ।। १।। बंधू हो दिनबंधू हो । रामदास म्हणे कृपासिंधू हो ।। २ ।। रामा हो जय रामा हो ।। पतीतपावन पूर्णकामा हो ।। ध्रु ।।
पद
भजन :- रामदास गुरु माझे आई । मजला ठाव द्यावा पायी ।।
अभंग
राम गावा राम ध्यावा । राम जीवीचा विसावा ।। १ ।। कल्याणाचे जे कल्याण। रघुरायाचें गुणगान ।। २ ।। मंगलाचें जे मंगल। राम कौसल्येचा बाळ ।। ३ ।। राम कैवल्याचा दानी रामदास अभिमानी ।। ।।४ ।।
भजन :- रघुपती राघव राजाराम । पतीतपावन सीताराम ।।
आम्ही अपराधी अपराधी आम्हा नाही दृढ बुध्दी ।। १ आमुचे अपराध अगणित कोण करील गणित ।। २।। मज सर्वस्वी पाळाचे प्रचितीने सांभाळाये ।।३।। माझी वाईट करणी रामदास लोटांगणी ।।४।।
(नैवेद्द समर्पण नंतर)
आरत्या
१
सुखकर्ता दुखहर्ता वार्ता विघ्नाची। नुरवी पुरवी प्रेम कृपा जयाची ।। सर्वांगी सुंदर उटी शेंदुराची। कंठी झळके माळ मुक्ताफळांची ।।१।। जयदेव जयदेव जय मंगलमूर्ति। दर्शनमात्रे मनकामना पूर्ति ।।ध्रु।। लंबोदर पितांबर फणिवर बंधना । सरळ सोंड वक्रतुंड त्रिनयना ।। दास रामाचा वाट पाहे सदना । संकटी पावावे निर्वाणी रक्षावे सुरवरवंदना ।।२।। जयदेव जयदेव जय मंगलमूर्ति । दर्शनमात्रे मनकामना पूर्ति ॥ ध्रु ।
2
साफल्य निजवल्या कौसल्या माता । भूकन्या आनस्या मुनिमान्या सीता । खेचर वनचर फणीवर भर्ता निजभ्राता। दशरथ नृपनायक धन्य तो पिता ॥ १।। जयदेव जयदेव जयरघुकुलटिलका। आरती ओवाळू त्रिभुवननायका ।। ध्रु ।। आचार्या गुरुवर्या कार्याचे फळ । रविकुळमंडण खंडण संसारमूळ ।। सुरवर मुनिवरकिन्नर ध्याती सकळ । धन्य तो निजदास भक्त प्रेमळ ।। जयदेव जयदेव जयरघुकुलटिलका । आरती ओवाळू त्रिभुवननायका ।। ध्रु ।।
३
सत्राणे उड्डाणे हुंकार वदनी । करि डळमळ भूमंडळ सिंधूजळ गगनी । कडाडले ब्रह्मांड धाके त्रिभुवनी । सुरवर नर निशाचर त्या झाल्या पळणी ।। १।। जयदेव जयदेव जय हनुमंता तुमचे नि प्रसादे न भिवो कृतान्ता ।। ध्रु ।। दुमदुमली पाताळे उठला प्रतिशब्द । थरथरला धरणीधर मानिला खेद । कडाडिले पर्वत उडुगण उच्छेद । रामी रामदासा शक्तीचा शोध ।। जयदेव जयदेव जय हनुमंता तुमचे नि प्रसादे न भिवो कृतान्ता ।। २।।
४
सुखसहिता दुखरहिता निर्मल एकांता । कलिमलदहना गहना स्वामी समर्था ।। न कळे ब्रह्मादिक अंता अनंता । तो तू आम्हा सुलभ जय कृपावंता ।। १।। जयदेव जयदेव जय करुणाकरा ।। आरती ओवाळू सद्गुरु माहेरा ।। ध्रु ।। मायेविण माहेर विश्रांतीचा ठाव । शब्दी अर्थलाघव बोलणी वाव ।। सद्गुरुप्रसादे सुलभ उपाव । रामी रामदासा फळला सद्भाव ।। जयदेव जयदेव जय करुणाकरा ।। आरती ओवाळू सद्गुरु माहेरा ।। २ ।।
६
भावाभावरहित वस्तुमार्ग दाविसी ।। नवविधभक्ततीपंथे स्वानुभवा देशी ।। विषयेच्छु असतां कर्ममोक्षेच्छु करिसी ।। अनन्य पाहुनी शिष्या उपासना देशी ।।१।। जयजय आरती सद्गुरु श्रीरामकृष्णा ।। स्वसुखा देऊनी निरसी तापत्रयतृष्णा ॥ ध्रु ।। आवणादि संशय निरसुनि शिष्याचे ।। उदासिन साक्षित्व अप्रतिहत साचे ।। ज्ञातृ त्रयादि निरसुनि सुबोध दे याचे ।। अनन्य गोविंदाचे नेले भ्रमातें ।। जयजय आरती सद्गुरु श्रीरामकृष्णा ।। स्वसुखा देऊनी निरसी तापत्रयतृष्णा ।। ध्रु ।।
सीतारामकी जय । रघुपती राघव राजाराम पतित पावन सिताराम ।। म्हणत प्रदक्षिणा करुन देवा पुढे उभे राहून खालील पद म्हणवे
ब्रह्माविष्णुहरादिक मानसी ध्याती ।। दयाळा मानसी ध्याती ।। सुरवर मुनिवर नारद तुंबर किर्तनी गाती ।। आगमनिगम शेष स्तविता मंदली मती ।। दयाळा मंदली मती ।। तो तू आम्हा पूर्णकामा मानवाप्रती ।। १।। राम जय जय जय जय आरती सद्गुरुस्वामी समर्था ।। दयाळा स्वामी समर्था ।। कायावाचा मनोभावे ओवाळीन आता ।। ध्रु ॥ ऋषिवर मुनिवर किन्नर देवा तुझे स्थापिले ।। दयाळा षड्दर्शने मत्त गुमाने पंथा चालिले ।। अपरंपार परात्परी पार न कळे दयाळा पार न कळे ।। पतितप्राणी पदा लागुनी कल्याण झाले।। राम जय जय जय जय आरती सद्गुरुस्वामी समर्था ।। दयाळा स्वामी समर्था ।। कायावाचा मनोभावे ओवाळीन आता ।। ध्रु ।।
पद १
त्रिविधतापहारक, हे गुरुपाय । भवसिंधुसी तारक हे. ।। १। स्वात्मसुखाचे बीज हे.। ज्ञानाचे निजगुज हे. । भक्त्तिपंथासी लावित हे. । नयनी श्रीराम दावित्ती हे. सहज शांतिचे आगर है. । पूर्ण कृपेचे सागर है. । रामदासाचे जीवन है. । सकळ जिवासी पावन हे.।
।। सीताकांतस्मरण जयजयराम ।।
पद २
वदन सुहास्य रसाळ हा, राघव । सर्वांगी तनु सुनीळ हा राघव । मृगनाभी रेखिला टीळा हा. राघव । सर्वांगी सुमन माळा हा राघव । साजिरी वैजयंती हा. राघव । पायी तोडर गर्जती हा. राघव । सुंदर लावण्यखाणी हा. राघव । उभा कोदंडपाणी हा. राघव । सकळ जीवांचे जीवन हा राघव । रामदासासी प्रसन्न हा राघव ।। २।।
पद ३
श्रीगुरुचे चरणकंज हृदयी स्मरावे ॥ ध्रु ।। निगम निखिल साधारण सुलभाहुनि सुलभ बहू । इतर योग याग विषम पथि का शिणावे ।। १।। श्रीगुरुचे चरणकंज हृदयी स्मरावे ॥धु॥ नरतनु द्रुढ नावेसी बुडवुनी अति मूढपणे । दुष्ट नष्ट कुकर सुकर तनु का फिरावे ।। २।। श्रीगुरुचे चरणकंज हृदयी स्मरावे ।। ध्रु ।। रामदास विनवी तुज अजून तरी समज उमज । विषय वीष पिउनी बळे फुकट का मरावे ॥ ३॥ श्रीगुरुचे चरणकंज हृदयी स्मरावे ।।
पद ४
जय बलभीमा नकळे सीमा वेदा तुझा महिमारे । तच गुणकीर्तन गाता स्तविता देसी सुखकर प्रेमारे । जय बलभीमा ॥ ॥ ध्रु॥ अंजनी माता तप आचरिता प्रसन्न झाला त्रिपुरारी । स्वयेतिच्या उदरा येउनी अवतरला हा मदनारी जय बलभीमा ।।२।। राम ध्यानी राम चिंतनी सर्वदा । ऐंशा पदा का न स्मरा जो कपि हारी आपदा जय बलभीमा ।।३।। मारुतिराया शरण जाउनी मागा आपुल्या हिताला । तोची मनोहर एक जनार्दन वंदी त्याच्या पदाला जय बलभीमा ।। ४।। जय बलभीमा नकळे सीमा वेदा तुझा महिमारे । तव गुणकीर्तन गाता स्तविता देसी सुखकर प्रेमारे । जय बलभीमा ॥ ध्रु॥
राजाधिराज रघुराज सद्गुरुराज महाराज
नंतर प्रदक्षिणा घालत खालील आरत्या म्हणाव्यात
१
सुखकर्ता दुखहर्ता वार्ता विघ्नाची। नुरवी पुरवी प्रेम कृपा जयाची ।। सर्वांगी सुंदर उटी शेंदुराची। कंठी झळके माळ मुक्ताफळांची ।।१।। जयदेव जयदेव जय मंगलमूर्ति। दर्शनमात्रे मनकामना पूर्ति ।। ।। लंबोदर पितांबर फणिवर बंधना । सरळ सोंड वक्रतुंड त्रिनयना ।। दास रामाचा वाट पाहे सदना । संकटी पावावे निर्वाणी रक्षावे सुरवरवंदना ।।२।। जयदेव जयदेव जय मंगलमूर्ति । दर्शनमात्रे मनकामना पूर्ति ॥ ध्रु॥
२
अजरामर पन्नगधर वैश्वानर भाळी। रसाळ वदने विशाळ नयनांजन भाळी ।। शूळी वेष्टीतसुरवर किन्नर ते काळी । हाटक करुणा नाटक करुणा कल्होळी ।। १।। जयदेवी जयदेवी जय वेद माते ।। आरती ओवाळू तुजला गुणसरिते ॥ ध्रु॥ जयदेवी ॥ हंसासन जगज्जीवन मननोहनमाता । पवनाशन चतुरानन थक्कित गुण गाता । अमृतसंजिवनी अंतरसुखसरिता । दासा पालन करिता त्वरिता गुणभरितां ।। जयदेवी जयदेवी जय वेद माते ।। आरती ओवाळू तुजला गुणसरिते ।। ध्रु ।। जयदेवी जयदेवी जय वेद माते ।। आरती ओवाळू तुजला गुणसरिते ।।
३
सुखसहिता दुखरहिता निर्मल एकांता । कलिमलदहना गहना स्वामी समर्था ।। न कळे ब्रह्मादिक अंता अनंता । तो तू आम्हा सुलभ जय कृपावंता ।। १।। जयदेव जयदेव जय करुणाकरा ।। आरती ओवाळू सद्गुरु माहेरा ।। ध्रु ।। मायेविण माहेर विश्रांतीचा ठाव । शब्दी अर्थलाघव बोलणी वाव ।। सद्गुरुप्रसादे सुलभ उपाव । रामी रामदासा फळला सद्भाव ।। जयदेव जयदेव जय करुणाकरा ।। आरती ओवाळू सद्गुरु माहेरा ।। २ ।।
४
साफल्य निजवल्या कौसल्या माता । भूकन्या आनस्या मुनिमान्या सीता । खेचर वनचर फणीवर भर्ता निजभ्राता। दशरथ नृपनायक धन्य तो पिता ॥ १।। जयदेव जयदेव जयरघुकुलटिलका। आरती ओवाळू त्रिभुवननायका ।। ध्रु ।। आचार्या गुरुवर्या कार्याचे फळ । रविकुळमंडण खंडण संसारमूळ ।। सुरवर मुनिवरकिन्नर ध्याती सकळ । धन्य तो निजदास भक्त प्रेमळ ।। जयदेव जयदेव जयरघुकुलटिलका । आरती ओवाळू त्रिभुवननायका ।। ध्रु ।।
५
सत्राणे उड्डाणे हुंकार वदनी । करि डळमळ भूमंडळ सिंधूजळ गगनी । कडाडले ब्रह्मांड धाके त्रिभुवनी । सुरवर नर निशाचर त्या झाल्या पळणी ।। १।। जयदेव जयदेव जय हनुमंता तुमचे नि प्रसादे न भिवो कृतान्ता ।। ध्रु ।। दुमदुमली पाताळे उठला प्रतिशब्द । थरथरला धरणीधर मानिला खेद । कडाडिले पर्वत उडुगण उच्छेद । रामी रामदासा शक्तीचा शोध ।। जयदेव जयदेव जय हनुमंता तुमचे नि प्रसादे न भिवो कृतान्ता ।। २।।
६
कमळाकर कौस्तुभधर क्षीरसागरवासी पतीत पावन नाम अगणित गुणराशी । नाभिंकमळी ब्रह्मा अगणित गुणराशी । न कळे महिमा स्तविता दशशत वदनासी ।।१।। जयदेव जयदेव जय नारायणा । आरती ओवाळू तुज पन्नगशयना ।। ध्रु॥ अधिदंडण भवखंडण मंडण देवाचे हरिदूरित परिपूरित निज हित सकळाचे । दशशत वेष्टीत स्वरूप शोभे गरुडाचे। राघव दासा भजन पूजन सगुणाचे ।। २।। जयदेव जयदेव जय नारायणा। आरती ओवाळू तुज पन्नगशयना ।। ध्रु॥ जयदेव जयदेव ।।
७
करुणाकर गुणसागर गिरिवरधरदेवे। लीला नाटक वेष धरिला स्वभावे । अगणित गुण लाघव हे कवण ठावे। व्रजनायक सुखदायक काय मि वर्णावे ।। १।। जयदेव जयदेव जय रामा रमणा। आरती ओवाळू तुज नारायणा ।। ध्रु ।। वृंदावन हरि-भूवन नूतन तनु शोभे वक्रांगे श्रीरंगे यमुनातट शोभे। मुनिजन-मानसहारी जगजीवन ऊभे । रविकुळटिळकदास पदरज त्यां लाधे। जयदेव जयदेव जय रामा रमणा । आरती ओवाळू तुज नारायणा ।। जयदेव ।।
८
लवथवती विक्राळा ब्रह्मांडी माळा विषे कंठ काळा त्रिनेत्री ज्वाळा लावण्य सुंदर मस्तकी बाळा तेथुनिया जळ निर्मळ वाहे झुळझुळा ।।१।। जयदेव जयदेव जय शिवशंकरा । आरती ओवाळू तुज विश्वंभरा ।। ध्रु॥ व्याघ्रांबर फणिवरधर सुंदर मदनारी। पंचानन मनमोहन मुनिजन सुखकारी। शतकोटीचे बीज वाचे उच्चारी । रविकुळ टिळक रामदासा अंतरी ।। २।। जयदेव जयदेव जय शिवशंकरा । आरती ओवाळू तुज विश्वंभरा ।। ध्रु ।।
९
सुरवर वरदायिनी मुरहर सुखसदना । परतः परवासिनी अरिविर कुलकदना । व्यापक सर्वाघटी जननी हे मदना। करुणासागर रुपें नांदशी शिवसदना ।।१।। जयदेवी जयदेवी जय विश्वंभरिते । आरती ओवाळू तुज कृपावंते ।। ध्रु ।। सकळा संजीवनी मुनिजनमनमोहनी। जनमन मज्जन सज्जन तापसतम शमनी । दासा अभ्यंतरी मानस मृदुशयनी। राघव वरदां सुंदर लाघव मृगनयनी ।। २।। जयदेवी जयदेवी जय विश्वंभरिते । आरती ओवाळू तुज कृपावंते ।।
१०
निर्जर वर स्मरहरधर भीमातिरवासी । पितांबर जघनी कर दुस्तर भवनाशी। शरणांगत वत्सल पालक भक्तासी । चालक गोपी जन मनमोहक सुखराशी ।।१।। जयदेव जयदेव जय पाडुरंगा। निरसी मम संगा निःसंगा भवभंगा ।। ध्रु ।। अणिमा लघीमा गिरिमा नेणती तव महिमा। नीलोत्पलदल विमल घननील श्यामा। कंटक भंजन साधुरंजन विश्रामा। राघवदासा विगलीत कामा निष्कामा ।।२।। जयदेव जयदेव जय पाडुरंगा। निरसी मम संगा निःसंगा भवभंगा ॥ ध्रु॥
११
अघहरणी पुष्करणी अगणित गुणखाणी। अगाध महिमा स्तविता न बोलवे वाणी । अखंडित तीर्थावलीअचपळ सुखदानी। अभिनव रचना पाहता तन्मयता नयनी ।।१।। जयदेव जयदेव जय व्यंकटेशा आरती ओवाळू स्वामी जगदीशा ॥ ध्रु॥ अति कुसुमालय देयालय आलय मोक्षाचे नाना नाटक रचना हाटक वर्णाचे । थक्कित मानस पहाता स्थल भगवंताचे । तुळणा नाही ते भूवैकुंठ साचे ।। २।। जयदेव जयदेव जय व्यंकटेशा। आरती ओवाळू स्वामी जगदीशा ॥ ध्रु॥
दिव्यांबरधर सुंदर तनु कोमल नीला । नाना रत्ने नाना सुमनांच्या माळा । नाना भूषणमंडित वामांगी बाळा । नाना वाद्ये मिनला दासांचा मेळा ।। ३।। जयदेव जयदेव जय व्यंकटेशा। आरती ओवाळू स्वामी जगदीशा ॥ ध्रु॥ जयदेव. ।।
१२
सुख सरिते गुण भरिते दुरिते निवारी। नि:संगा भवभंगा चिदगंगा तारी। श्रीकृष्णे अवतार जलवेषधारी। जलमय निर्मल देहे साक्षात हरी ।। १।। जयदेवी जयदेवी जयमायकृष्णे । आलो तुझीया उदरा निरसी मम तृष्णे ॥ ध्रु॥ हरिहर सुंदर ओघ ऐक्यासी आले । प्रेमानंदे बोधे मिळणी मिळाले । ऐशीया संगमी मिसळोनी गेले । रामदास त्याची वंदी पाऊले ।। २।। जयदेवी जयदेवी जयमायकृष्णे । आलो तुझीया उदरा निरमी मम तृष्णे ॥ ध्रु॥
१३
भीम भयानक रूप अद्भूत। वजदेही दीसे जैसा पर्वता टौकारुनी नेत्रे रोम थरथरीत । स्थिरता नाही चंचल झाला उदीत ।।१।। जयदेव जयदेव जय महारुद्रा । आरत भेटीजे जय जय कपींद्रा ॥ ध्रु॥ हुंकारुनी बळे गगनी उसळला । अकस्मात जानकीसी भेटला ।। वन विध्वंसुनि आखया मारीला । तत्क्षणी लंकवरी चवताळला ।। जयदेव जयदेव जय महारुद्रा । आरत भेटीजे जय जय कपींद्रा ।। जयदेव ।। २।। आटोपेना वानर हटवादी धीट । प्रज्वाळीला जाळू पाहे त्रीकूट। म्हणवूनि स्थिरचर करिती बोभाट धडाडीला वन्ही शिखा तांबट ।। जयदेव जयदेव जय महारुद्रा । आरत भेटीजे जय जय कपींद्रा ।। जयदेव ।। ३ ।। कडकडीत ज्याळा भड़का विशाळ । भुभुक्कारे करुनि भूवांडीला गोल ।। घोर हाहा: कारे पळती सकळ । ओढावला वाटे प्रलयकाळ ।। जयदेव जयदेव जय महांरुद्रा । आरत भेटीजे जय जय कपींद्रा ।। जयदेव ।। तृतीय भाग लंका होळी पैं केली । जानकीची शुध्दि श्रीरामी नेली ।। देखोनी आनंदे सेना गजबजली । रामी रामदासा निजमेटी झाली ।। जयदेव जयदेव जय महारुद्रा । आरत भेटीजे जय जय कपींद्रा ।। जयदेव ।। ५।।
या आरत्या म्हणून प्रदक्षिणा झाल्यावर श्रीस सर्वांनी साष्टांग नमस्कार घालून पुढील पदे म्हणावी
पद
आनंदरस मी प्याला भवताप शांतचि झाला ।। आनंद. ।। ध्रु॥ अनंतकोटि कल्मषपाश पावे एका समयी नाश ।। दृढ धरितां सद्गुरुची कास ।। निजगुज सांगुनी गेला ।। आनंद ।। १।। आता मजहो कैचे ध्यान ।। निरसुनि गेले समुळहि भान ।। श्रवण कराया नाही मजकान।। संकल्पचिनीमाला ।। आनंद. ।। मेली अद्यती मोहमाय ।। केला जीणे दृढ व्यवसाय । रामसखा तो शोकेल काय ।। चिन्मय होउनि ठेला ।। आनंदरस. ।।३।।
पद
रामा तुज कल्याण मागणे ।। तू जगजीवन तू मनमोहन । कोण आहे तुजवीण ।। १।। आम्हीं अज्ञजन तू जनपालन । बोलती वेदपुराणे ।। २।। देवही आले भक्त मिळाले आनंदे तुझ्या गुणे ।।३।। देव सुखी ऋषी भक्त सुखी हो । दास म्हणे तुझे देणे । रामा तुज कल्याण मागणे ।। ४।।
सिताराम की जय ।
(यापुढे रामायणातील सुंदर कांडाचे वाचन करणे.)
पुराण
नागाव येथे अध्यात्मरामायणांतील सुंदर कांड व नंतर महा नैवेद्य भोजन वगैरे
पांढरा मारुती संस्थान नागाव हाटाळा
तालुका : अलिबाग जिल्हा : रायगड
