श्री साखरामबोवा यांचा जन्म रत्नागिरी जिल्ह्यात दाभोळनजीक करंबवणे गावी मिती जेष्ठ शुद्ध ८ शके १७२३ (सन १८०१) रोजी झाला. वडिलांचे नाव हरिपंत केतकर व मातु:श्रीचे नाव गोपिकाबाई. बोवास तीन भाऊ व चार बहिणी होत्या. बोवा सात वर्षांचे झाल्यावर त्यांचे मौजिबंधन झाले व त्यानंतर वडिलांचे देखरेखीखाली त्यांचे वेदाध्ययन सुरु झाले. त्यांनंतर वे . मु. जगन्नाथशास्त्री आठल्ये यांजकडे ते पुढील अध्यायनाकरता तारापूर येथे आले.
तारापूर येथील अध्ययन पूर्ण झाल्यावर काही दिवस बोवा अलिबागेस न्यायशास्त्राचे अभ्यासकरता होते व तेथून पुढे पुणे येथील विश्रामबाग पाठशाळेत जाऊ लागले. तेथपासून ते माधुकरी मागून राहू लागले व तो क्रम शेवटपर्यंत राहिला.
येथे असताना त्यांची प्रवृत्ती योगाभ्यासाकडे होऊ लागली. पुणे येथे अध्ययन समाप्त झाल्यानंतर त्यांनी वे.मु.रघुनाथ भटजी मोघे नाशिककर यांचेपासून गुरुपदेश घेतला. ब्रंह्माभ्यासाकरता योग्य ठिकाण शोधीत असता ते कवाड येथे आले व ते ठिकाण त्यास सर्व द्रुष्टीने रहाणेस सोयीस्कर वाटल्याने त्यांनी तेथे कायम वस्ती केली.
बोवा कवाड येथे मिती वैशाख शुध्द १ शके १७४६ (सन १८२४) रोजी आले व वे.मु.गदाधरभट घागुरडे यांजकडे उतरले ते कायमचे तेथेच राहीले. यापुढे बोवांचा ठराविक आयुष्यक्रम सुरु होऊन तो त्यांचे कवाड येथील ४३ वर्षाच्या वास्तव्यात सतत टिकला.
ते मोठया पहाटे उठून पोवईचे विहिरीवर प्रातर्वीधि उरकून नदीवर स्नाना झाल्यानंतर संध्या ब्रम्हयज्ञ उरकून कोठे तरी निवांतस्थळी योगाभ्यस करीत. सुमारे बारा वाजता गावात परत येऊन ठराविक पाच घरी मधुकरी घेत.
भोजनानंतर काही वाचन व आलेल्या विद्यार्थ्यास पाठ देऊन रानात योगाभ्यासाकरता जात ते रात्री संध्यावंदनाकरता गावात परत येत व बरीच रात्र होईपर्यंत भोजन करून नंतर झोपी जात.
असा वर्तनक्रम असे. लहानपणी वडिलांनी बोवांचे इच्छेविरुद्ध त्यांचे लग्न केले होते परंतु बोवांनी गृहस्थाश्रम केव्हाच स्वीकारला नाही. लग्नानंतर एक वर्षाचे आतच त्यांची पत्नी निवर्तली . बोवांची प्रसिद्धी थोडयाच काळlत सर्वत्र पसरली व त्याच दर्शनाकरता व त्यांचे जवळ अध्ययन करणेकरता दूरदूरची मंडळी नेहमी येऊ लागली.
त्यांचे दर्शनाकरता गरीबांपासून संस्थानिकापर्यंत सर्व दर्जाची मंडळी येत. प्रत्येकास योग्य असा उपदेश बोवा करीत. स्वतः अत्यंत विरक्त असल्याने बोवास कसलीही अपेक्षा नसे. दर्शनाकरता आलेले लोकांनी ठेवलेले द्रव्य व इतर जिन्नस ते नेहमी गरीब व अनाथास वाटून टाकीत.
शके १७५७ (सन १८२८) मध्ये बोवा काशीयात्रेस गेले व एक वर्ष काशीवास करून नंतर कावाडास परत आले .बोवांचे योग सामर्थ्याच्या निदर्शक कित्येक कथा प्रसिद्ध आहेत. त्यांचे शिष्य वर्गामध्ये पुष्कळ विद्वान गृहस्थ आहेत.
धार संस्थानाचे अधिपती शके १७८५ (सन १८६३) मध्ये बोवांचे दर्शनास कवाडास आले होते. त्याचप्रमाणे श्री . खंडेराव महाराज गायकवाड बडोदेकर हे शके १७८६ (सन १८६४) मध्ये बोवांचे दर्शनाकरता व आशीर्वाद घेणेकरता कवाड येथे येऊन लवाजम्यासह सुद्धा दोन दिवस राहिले होते.
दळणवळणांची साधने त्या काळी सुलभ नसतानाही बोवांची कीर्ती किती दूरवर पसरली होती हे या गोष्टीवरून दिसून येते. अत्यंत निष्कलंक रितीने आपले आयुष्य घालवून व शक्य तितक्या प्रकाराने आपणाकडे येणाऱ्या लोकांचा उद्धार करून व त्यास उत्तम मार्ग दाखवून बोवा शके १७८९ (सन १८३७) मध्ये भाद्रपद वध ७ रोजी समाधिस्थ झाले.
निर्याणापुर्वी थोडा वेळ त्यांनी चतुर्थाश्रमाचा स्वीकार केला व आश्रमाचे नाव ‘चिद्घन’ असे स्वीकारले. अशा प्रकारे कवाड येथील महाराजांचे ४३ वर्षाचे वास्तव्य संपले. त्यांचे समाधीनंतर त्यांचे योग्य प्रकारे स्मारक मंदिर उभारणेचे शिष्य मंडळींनी ठरविले. परंतु आजन्म अक्षरशः विरक्त वृत्तीने काढला असल्याने समाधी मंदिराकरता पैसे उभे करण्याचे मोठे कठीण काम होते
परंतु त्या बाबतीत बोवांचे शिष्यवर कै.ह.भ.प. रामकृष्णबोवा माटे यांनी फार परिश्रम केले व भिक्षावृत्तीने व कीर्तन पुराणे सांगून रक्कम उभी केली. या रकमेतून बुवांचे समाधीची व सभामंडपाची सुंदर इमारत बांधली आहे.
मुख्य गाभाऱ्यात बोवांचे उपास्थ दैवत श्रीलक्ष्मीकेशवाच्या मूर्ती असून यांचे पुढे बोवांची समाधी आहे. कै. माटेबोवांनी वर्गणी जमवून देवालयाकरता कायम उत्पन्न काही असावे म्हणून थोडी शेतजमीनही विकत घेतली. कै. माटेबोवांनी एक धर्मशाळाही बांधली आहे.
ह्यानंतर कै. माटेबोवा समाधिस्त झाले. त्यांची समाधी अलिबाग तालुक्यात नागाव येथे असून तेथेही कवाडप्रमाणेच दरसाल माघ वध पंचमीपासून ९ पर्यंत पाच दिवस उत्सव होतो.
कै .माटेबोवा यांचे शिष्य कै.वामन बोवा पंडीत यांनी या देवस्थानची व्यवस्था बरीच वर्षे पहिली. त्यांनीही भिक्षावृत्तीने रक्कम जमवून देवालयानजीक पाकशाळा, नगारखाना वैगरे इमारती बांधविल्या व अशा रीतीने देवस्थानास सध्याचे स्वरूप प्राप्त झाले आहे.
हल्ली देवस्थानची सर्व व्यवस्था पंचमंडळाकडे आहे. दरसाल भाद्रपद वध ५ ते ७ पर्यंत बोवांचे पुण्यतिथीचा उत्सव व मार्गशीर्ष शुद्ध १३ ते वध १ पर्यंत श्रीदत्तजयंतीचा उत्सव कवाउ येथे होतात.
दोन्ही उत्सवास यात्रेकरूंची पुष्कळच गर्दी होते. देवस्थानचा वार्षिक सर्वसाधारण खर्च व वरील दोन्ही उत्सवांचा खर्च मिळून जी एकूण रक्कम लागते त्यापैकी फक्त निम्मी रक्कम देवस्थानच्या जमिनी व इतर देणग्या यापासून मिळते व बाकी निम्म्या रकमेकरता नेहमी भिक्षेवर अवलंबून रहावे लागते .
बोवांचा आयुष्यक्रम ज्याप्रमाणे साधा व मधुकरी वृत्तीचा होता त्याचप्रमाणे देवस्थानचा कारभारही त्यांचे संप्रदायिकानी त्याच तऱ्हेचा ठेवलेला आहे.देवस्थानाकरता लागणारया खर्चाची तजवीज बोवांचे शिष्य वर्गाकडून इतर जनतेकडून आज सुमारे ११० वर्षे तत्परतेने केली जात आहे
बोवांचे पुण्याइने ती अव्याहत केली जाईल . कवाड हे ठिकाण ठाण्याहून १३ मैल , कल्याणहून १० मैल व भिवंडीहून ४ मैल सडकेवर ठिकाणापासून एस.टी.ची सोय आहे.हल्ली ठाणे,कल्याण भिवंडीहून वर्जेश्वरीस जो रस्ता जातो त्या भिवंडी-वाडा रस्त्यावर
भिवंडीपासून ४ मैलावर कवाड हे ठिकाण आहे. त्यामुळे मुंबई व इतर ठिकाणाहून वर्जेश्वरीस जातेवेळी कवाड यथे बोवांचे समाधी दर्शन घेणे फार सुलभ झाले. तरी दर्शनेछुनी योग्य तो फायदा घ्यावा.
पांढरा मारुती संस्थान नागाव हाटाळा
तालुका : अलिबाग जिल्हा : रायगड
