श्रीसंस्थान नागांव येथील उत्सवाचा कार्यक्रम

प्रातःकाळचे कार्यक्रम

(सकाळी ६०० ते ७ ०० चे दरम्यान ) (काकड आरती पूर्वी महाव्दार बंद ठेवाये व नंतर खालील श्लोक म्हणून भजनापासून प्रारंभ करावा)

।। जय जय रघुवीर समर्थ ।।

अथ ध्यानं

ब्रह्मानंदं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिम । व्दंव्दातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यं ।। एक नित्यं विमलमचलं सर्वधी साक्षीभूतं । भावातीतं त्रिगुणरहितं सद्‌गुरुं तं नमामि ।। १ ।। ध्यायेदाजानुबाहुं धृतशरधनुषं बध्दपद्मासनस्थं । पीतं वासोवसानं नवकमलदलस्पर्धि नेत्रं प्रसन्नं ।। वामांकारुढसीतामुखकमलमिलल्लोचनं नीरदाभं । नानालंकारदीप्तं दधतमुरुजटामंडणं रामचंद्रं ।। २ ।। मनोजवं मारुततुल्यवेगमं जितेंद्रियं बुध्दीमतां वरिष्ठम् । वातात्मजं वानरयूथमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये ।। ३।। परं रामदासं समर्थ ममाद्यम् ।। गुरुम् रामरत्यै हनुमद्वतारम् ।। जगत् तारकं भासकं स्वात्मनोऽहम् ।। जनांधंतमारे : पदाब्जं नमामि ।। ४ ।। शुकासारिखें पूर्ण वैराग्य ज्याचें । वसिष्ठापरी ज्ञान अद्भूत साचें । कवि वाल्मिकासारिखा मान्य ऐसा ।। नमस्कार माझा गुरु रामदासा ।। ५ ।।परब्रह्म सत्य चिदानंदरूपं । जगदव्यापकं सर्वभूतांतरस्थम् । असंगं निरीहं सदा स्वप्रकाशं भजे राघवेंद्र गुरुणां वरिष्ठम् ।। ६ ।।मोक्षार्गलाच्छेद सुसत्वदीक्षम् । कपाटसंस्थं समराजवंदितं । मद्वृत्तिनानात्वविलोपिशीलम् । श्रीमत्सखारामगुरु नमामि ।। ७ ।। नमः संतं जगव्दद्यं वस्तुत्वेन सदास्थितम् । लोकानुसारिणं रामकृष्णं मम हृदिस्थितम् ।। ८ ।। सच्चिदानंदकंदाख्यं सहजज्ञानवैभवम् । मच्चित्तदोषदहनं गोविंदं प्रणतोस्म्यहम् ।। ९ ।। दृष्ट्वावृंदं देहभाजानृलोके दयासागरः स्वात्मबोधाय तस्य अजोपेक आनंद रुपोवतीर्णमतं सद्‌गुरु विष्णुनामान मिढये ।

जय जय रघुवीर समर्थ ।। १० ।।

भजन : जयजय राम राम राम । सीताराम राम राम ।।

रामा हो जय रामा हो ।पतीतपावन पूर्णकामा हो ।। ध्रु. ।। नाथा हो दिननाथा हो ।तुझिया चरणी राहो माथा हो ।। १ ।। बंधू हो दिनबंधू हो ।रामदास म्हणे कृपासिंधू हो ।। २ ।। रामा हो जय रामा हो ।पतीतपावन पूर्णकामा हो ।। ध्रु. ।।

भजन

रामदास गुरु माझे आई। मजला ठाव द्यावा पायी ।।

अभंग

राम गावा राम ध्यावा । राम जीवीचा विसावा ।। १ ।। कल्याणाचे जे कल्याण। रघुरायाचें गुणगान ।। २ ।। मंगलाचें जे मंगल। राम कौसल्येचा बाळ ।। ३ ।। राम कैवल्याचा दानी रामदास अभिमानी ।। ।।४ ।।

भजन

रघुपती राघव राजाराम । पतीतपावन सीताराम ।।

भूपाळ्या

प्रातःकाळी प्रातःस्नान । घडे केलिया स्मरण ।।महादोषांचें दहन । महिमा गहन पुराणीं ।। ध्रु ।।गंगायमुनासरस्वती । कृष्णावेण्णाभागीरथी ।पूर्णफल्गूभोगावती । रैवागौतमीवैतरणी ।। १ ।।कुंदावरदामाहेश्वरी । तुंगभद्रा आणि कावेरी ।गणिका तप्ती मलापहारी । दुरिते हरी जान्हवी ।। २ ।।काली कालींदी किंकिणी । कपिलायणी इंद्रायणी ।नलिनी अर्चिनी धर्मिणी । ताम्र-पर्णी नर्मदा ।। ३ ।।मणिकर्णिका भोगावती । ककुद्मती हेमावती ।सीता प्रयाग मालती। हरिव्दती गंडिका ।। ४ ।।भीमा वरदा मंदाकिनी । महापगा पुनःपुनी । वज्रा वैष्णवी कुमुदिनी। अरुणावरुणा नारदी ।। ५ ।।शरयू गायत्री समुद्रा । कुरुक्षेत्रसुवर्णभद्रा दास म्हणे पुण्यक्षेत्रा । नाना नद्या गोविंदीं ।। ६।। प्रातः काळी प्रातः स्नान। घडे केलिया स्मरण ।। महादोषांचे दहन । महिमा गहन पुराणीं ।। ध्रु।।

राम आकाशी पाताळी । राम नांदे भूमंडळीं । राम योगियांचे मेळीं । सर्वकाळी तिष्ठत ॥ ध्रु॥ राम नित्य निरंतरी। राम सबाहय अभ्यंतरीं । राम विवेकाचे घरीं । भक्तीवरी सांपडे ।।१।। राम भावें ठायीं पडे । राम भक्तीशी आतुडे । राम ऐक्यरुपी जोडे । मौन पडे श्रुतीशीं ।।२।।राम योग्याचे मंडण । राम भक्ताचे भूषण । राम आनंदाचा घन । करी रक्षण दासांचें ।। ३।।राम आकाशीं पाताळीं । राम नांदे भूमंडळीं । राम योगियांचे मेळीं । सर्वकाळी तिष्ठत ॥ध्रु॥

3

राम सर्वांगी सांवळा । हेम अलंकार पिवळा । नानारत्नाचिया कळा । अलंकार शोभती ।। ध्रु ।। पिंवळा मुगूट किरिटी । पिवळे केशर लल्लाटीं । पिंवळ्या कुंडलाच्या थाटी। पिवळ्या कंठी वनमाळा।। १।।पिंवळे पदक करभूषणें । बाहुवटीं करकंकणें ।पिंवळ्या मुद्रिकाचें लेणें । पिंवळे करी शरचाप ।। २।।पिंवळा कांसे पितांबर । पिंवळ्या ब्रीदाचा तोडर । पिंवळ्या घंटांचा गजर । पिंवळ्या वाक्या शोभती ।। पिंवळा मंडप विस्तीर्ण । पिवळे मध्ये सिंहासन । रामसीतालक्ष्मण । दास गुण गात असे ।। ४।। राम सर्वांगी सांवळा । हेम अलंकार पिवळा । नानारत्नाचिया कळा । अलंकार शोभती ।। ध्रु ।।

धवळे भोळे चक्रवर्ती । धवळे अलंकार शोभती । धवळे ध्यान उमापती । सदा चित्ती स्मरावें ।। ध्रु ।। धवळ्या जटा गंगाजळ । धवळा मयंक निर्मळ । धवळे कुंडलाचा लोळ । शंख पाळा लोंबती ।। १।।धवळी स्फटीकाची माळ । धवळे गळा उलथे व्याळ ।धवळे हातीं नरकपाळ । धवळा त्रिशूळ शोभतसे ।। धवळा सर्वांगी आपण । धवळे विभूतीचे लेपन । धवले गात धवळें वसन । धवळे वहन नंदीचे ।। ३।।धवळे कैलास भूवन । धवळे मध्ये सिंहासन । धवळे शंकराचे ध्यान । दास चिंतन करितसे ।। ४।। धवळे भोळे चक्रवर्ती । धवळे अलंकार शोभती । धवळे ध्यान उमापती । सदा चित्ती स्मरावें ।। ध्रु ।।

उठी उठी बा रघुनाथा । विनवी कौसल्यामाता । प्रभात झालीसे समर्था । दाखवी आतां श्रीमुख ।। ध्रु ।। कनकताटी आरतीया । घेऊनी क्षमा शांतिदया ।आली जनकाची तनया । ओंवाळाया तुजलागीं ।। १ ।। जीवशीव दोघे जण । भरत आणि शत्रुघ्न । भाऊ आला लक्ष्मण । मनउन्मन होउनियां ।। २।। विवेक वसिष्ठ सद्गुरु । संत महंत कुलेश्वरु ।करिती हरी नामें गजरु । हर्षे निर्भर होऊनियां ।। ३।। सुमंत सात्त्विक प्रधान । घेऊनी नगरवासीजन । आला वायुचा नंदन । श्रीचरण पहावया ।। ४।। माझ्या जीवीच्या जिव्हाळा । दीनबंधू दिनदयाळा । भक्त जनाचिया वत्सला । देई दयाळा दर्शन ।।५।। तंव तो राजीवलोचन । राम जगतत्रय जीवन । स्वानंदरूप होऊन । दासां दर्शन दिधले ।। ६।। उठी उठी बा रघुनाथा । विनवी कौसल्यामाता । प्रभात झालीसे समस्था । दाखवी आतां श्रीमुख ।। ध्रु ।।

चोपदाराची ललकारी

राजाधिराज रघुराज सद्गुरुराज महाराज, समस्त यात्रस्थ क्षेत्रस्थ हुद्देदार व सेवेकरी मंडळी, वसिष्ठराज, लक्ष्मण, भरत, शत्रुघन, नल नील जांबवान, अंगद, सुग्रीव, बिभिषण, मारुतीराज, दर्शनाकरिता महाव्दाराचे ठायी तिष्ठत आहेत. त्यांस दर्शनाची आज्ञा :- अज्ञान निरसन सुखीभव.

राजाधिराज रघुराज सद्गुरुराज महाराज (महाव्दार उघडावे)

उठी उठी बा गुरुनाथा । विनवी गोपिका माता । सखारामा चिद्धनरुपा । विश्वतारी पूर्ण कृपा ।। ध्रु ।। तूं जव योगनिद्रा रामा । न सोडिसी आपुली । तंव आम्हा जागवाया । तुजला कृपा नाहीं आली ।। १।। आम्ही दीन मोहनिद्रेत । सदा निद्रिस्थ । तुझीया स्मरणें आम्ही । बाळे होतो तटस्थ ।। २।। तुझीया सत्ता स्वरुपी । रामा विक्षेप नाही ।दुसरें कांही नसे । म्हणवुनि पर काही नाही ।। ३।।असे असोनी दीना । आम्हा का उपेक्षीसी । शरण आले तरी । त्यांना ढकलोनी देसी ।। ४ ।। म्हणुनि आम्हापाशी । गुरु बोल एक बोल । तुम्ही कां रडतां । तुम्हा नाही कळिकाल ।। ५।। अथवा आम्हां दासां । तुझी देई योग-निद्रा । विनवीं रामकृष्ण । मजला करी वितृष्ण ।। ६ ।। उठी उठी बा गुरुनाथा । विनवी गोपिका माता । सखारामा चिद्घनरुपा । विश्वतारी पूर्ण कृपा ।। ध्रु ।।

उठी उठी बा गुरुनाथा । चरणी अर्पिला माथा । सदय हृदय आपण । अभय कर द्या माथा ।। ध्रु ।। किती वर्ण मी प्रताप । एका स्वचरण-रजाचे । एका संकट व्दैता तोडी । अहंब्रह्म गाथे ।। १।। जागे व्हा जागे व्हा । ऐसे सर्वही बोलती । आपुला जागेपणा । कोणी कधीही नेणती ।। २।। स्वप्रकाशरुपी । जागे नित्य निरंतर आहा । जीवा ज्ञाने आम्हा । परी सौषुप्त भास हा ।। ३।। जयजयाजी अनंत रुपा । स्वात्मानंदप्रकाशका । आप्तकामा आत्मारामा । नेई स्वस्वरुपधामा ।। ४।। जयजयाजी व्यापका । सकल इंद्रियांच्या चालका । असंग रुपें करुनी। अंतर्बाह्य पालका ।। ५।। जयजयाजी दयानिधे । क्षमाशांत्यादि गुणनिधे । प्रेमळ भक्तांच्या सन्निधे । विद्यानिधे सुखधामा ।। ६ ।। जयजयाजी गुरुवर्या । भवहारक तव परिचर्या । करुनि साधिती आत्मकार्या । ते तुज अतिप्रिय ।। ७।। ऐसे रामकृष्ण झाले । गुरुभक्ति उध्दरिले । प्रत्यक्ष परब्रह्म झाले । संशय नसे यांमध्यें ।। ८ ।। ऐसी सद्गुरु जागृति । भक्त सर्वही वर्णिती । रामकृष्णकृपाज्योति । गोविंद जागा स्वस्वरुपी ।। ९।। उठी उठी बा गुरुनाथा । चरणी अर्पिला माथा । सदय हृदय आपण । अभय कर द्या माथा ।। ध्रु ।।

उठी उठी बा गुरुराया । मस्तक अर्पिला पाया । ईक्षणें निरसी मिथ्या माया । आम्हां दासां पाहुनि ।। धु ।। जयजय इच्छारहित रुपा जगदंतरी सद्रूपा । योगनिद्रा सांडूनि कृपा । करुनि निरसी अज्ञाना ।। १।। सद्गुरुकृपाकटाक्षे । अहंभावा ठाव नसे। संकल्प-विकल्प- रहित वसे । वस्तुत्वेंची अखंड ।। २।। आवरुनी मायेचा गलबला । गोविंदें गोविंद पाहिला । परमच्छेनें प्रकट जाहला । जगदोध्दाराकारणें ।। ३।। उठी उठी बा गुरुराया । मस्तक अर्पिला पाया । ईक्षणें निरसी मिथ्या माया । आम्हां दासां पाहुनि ।। ध्रु ।।

राजाधिराज रघूराज सद्गुरुराज महाराज

काकड आरती

काकड आरती । परमात्मया श्रीरघुपती । जीवीं जिवा ओवाळिन । निजिं निजात्म-ज्योती ।। ध्रु ।। त्रिगुण काकडा व्दैत धृतें तिंबिला । उजळली आत्मज्योती तेण प्रकाश जाहाला ।। १ ।। काजळी नामस अवघे तेज डळमळ । अवनी ना अंबर अवघा निघोट निश्चळ ।। २।। उदय ना अस्त जेथे बोध प्रातःकाळी। रामीरामदासी सहजी सहज ओवाळी ।। ३।। काकड आरती । परमात्मया श्रीरघुपती । जीवी जिवा ओवाळिन । निजिं निजात्म-ज्योती ।। ध्रु ।।

काकड आरती माझ्या सद्गुरु सखारामा । चिद्घनधामा पूर्ण ब्रह्मा नाशी विश्वतमा ।। ध्रु ।। शमदम श्रध्दा त्रिगुण काकडा केला । भक्तिघृते तिंबिला बोधे प्रदिप्त केला ।। १।। तेणे माझा भ्रम सर्वही नासुनी गेला । मी माझा हा बोल फोल मज दावियला । २।। विश्व सर्वही मजला गुरु सखाराम दिसे । मी माझे ऐसे जेणे होत नाहीसे ।। ३।। विश्व नसे ब्रह्म असे हेही मिथ्याच भासे ।। हे काहीच नसे जें जें जैसेचि तैसे ।। ४ ।। मी खाऊनि आपण स्वये समाधिस्त झाला । चिद्धन गुरु रामकृष्ण ऐसे बोलियला ।। ५ काकड आरती माझ्या सद्‌गुरु सखारामा । चिद्घनधामा पूर्ण ब्रह्मा नाशी विश्वतमा ।। ध्रु ।।

काकड आरती माझ्या सद्गुरु नाथा । मनोभावे प्रेमे चरणी अर्पिला माथा ।। ध्रु ।। ज्याचेनि प्रकाशती प्रवृत्ति आणि निवृत्ति ऐसा अहंस्फुरणकाकडा नित्य विज्ञानी बोलती ।। १ ।। जैसी इच्छा तैसे बंध मोक्ष हे दोन्हीं । म्हणुनि सूज्ञ इच्छिती इच्छा घृत स्थानी ।। २।। सम सदय चैतन्य सर्वही स्वप्रकाश भासे । हाची मुख्य अग्नि अग्नि ज्यामुळे असे ।। ३ ।। घृतयुक्त काकडा बोधे प्रदिप्त केला । गोविंद दास याने सद्‌गुरु रामकृष्ण पाहिला ।। ४ ।। काकड आरती माझ्या सद्गुरु नाथा । मनोभावे प्रेमे चरणी अर्पिला माथा ।। ध्रु ।।

काकड आरती माझ्या सद्‌गुरुराया । प्रत्यकरुपा अभिन्न काया भ्रमदाउनि नेई लया ।। ध्रु ।। वृत्तीद्वारा विषयभोग कवणासी होती । होती वा न होती कोणी कधी ही नेणती ।। १ ।। भोक्तृ भोग्य भ्रमरहित स्वयंप्रकाश देऊ । आम्ही का जीवू सदया दाखवी भेवू ।। २।। ऐसे ऐकुनी स्वये बोध दीपिका दीधली । श्रध्दाविवेक घृते तिंबुनी स्वयंज्योति प्रकाशली ।। ३ ।। आपणासकट भासा दवडुनि सच्चिदानंद पूर्ण । गोविंदे गोविंद केला हेची गुरुकृपा खूण ।। ४ ।। काकड आरती माझ्या सद्‌गुरुराया । प्रत्यकरुपा अभिन्न काया भ्रमदाउनि नेई लया ।। ध्रु ।।

ओंवाळा ओंवाळा सद्‌गुरु रामदास राणा । पंचही प्राणांचा दीपक लाविला जाणा ।। धृ० ।। तिमिर अज्ञान योगें रामा उजळल्या वाती । ज्ञान योग प्रकटला तेणें प्रकाशल्या ज्योती ।। १ ।। निर्गुण निरंजन सद्गुरु रामदास । दर्शन मंगलप्रद कल्याणाचा कळस ।। २ ।। ओंवाळा ओंवाळा सद्‌गुरु रामदास राणा । पंचही प्राणांचा दीपक लाविला जाणा ।। धृ० ।।

पंचारती गाभाऱ्याचे बाहेर आणून प्रदक्षिणेच्या वाटेने तुळसी वृंदावन, मंडपातील स्थापलेला गणपती तथा भक्त जनांना दर्शन देऊन पुनः मंदिरात न्यावी.

अभंग

छत्र-सुखासनी अयोध्येचा राजा । नांदतसे माझा माय-बाप ।। ध्रु ।। माझा मायबाप त्रैलोकी समर्थ । सर्व मनोरथ पूर्ण करी ।। १।। पूर्ण प्रतापाचा कैवारी देवांचा । नाथ अनाथांचा स्वामी माझा ।। २ ।। स्वामी माझा राम योगीया विश्राम । सापडले वर्म थोर भाग्यें ।। ३।। थोर भाग्य त्याचे राम ज्याचे कुळीं । संकटी सांभाळी भावबळें ।। ४ ।। भावबळे जेहीं धरिला अंतरी । तया क्षणभरी विसंबेना ।। ५ ।। विसंबेना कदा आपुल्या दासासी । रामी रामदासी कुलस्वामी ।। ६ ।।

भजन

रामदास माउली गुरु रामदास माउली ।।

अभंग

धन्य सूर्यवंश पुण्यपरायण । सर्वही सगुण समुदाव ।। १।। समुदाव काय सांगों श्रीरामाचा । अंतरीं कामाचा लेश नाही ।। २ ।। लेश नाही तया बंधू भरतासी । सर्वही राज्यासीं त्यागियलें ।। ३।। त्यागियले अन्न केलें उपोषण । ध्न्य लक्ष्मण ब्रह्मचारी ।। ४।। ब्रह्मचारी धन्य मारुति सेवक । श्रीरामीं सार्थक जन्म केला ।। ५।। जन्म केला धन्य वाल्मिक ऋषीनें। धन्य ती वचनें भविष्याचीं ।। ६ ।। भविष्य पहातां धन्य बिभीषण । राघवी शरण सर्व भावें ।। ७ ।। सर्व भावें सर्व शरण वानर । धन्य ते अवतार विबुधांचे ।। ८ ।। विबुध मंडण राम सर्व गुण । अनन्य शरण रामदास ।। ९।।

भजन

रामदास माउली । गुरु रामदास माउली ।

पद

त्रिविधतापहारक, हे गुरुपाय । भवसिंधुसी तारक हे. ।। १। स्वात्मसुखाचे बीज हे.। ज्ञानाचे निजगुज हे. । भक्त्तिपंथासी लावित हे. । नयनी श्रीराम दावित्ती हे. सहज शांतिचे आगर है. । पूर्ण कृपेचे सागर है. । रामदासाचे जीवन है. । सकळ जिवासी पावन हे.।

।। सीताकांतस्मरण जयजयराम ।।

पद

वचन सुहास्य रसाळ हा, राघव । सर्वांगी तनु सुनीळ हा.। मृगनाभी रेखिला टीळा हा. । सर्वांगी सुमन माला हा । साजिरी वैजयंती हा. । पायी तोडर गर्जती हा. । सुंदर लावण्यखाणी हा.। उभा कोदंडपाणी हा. । सकळ जीवांचे जीवन हा । रामदासासी प्रसन्न हा राघव ।। २।।

पद

श्रीगुरुचे चरणकंज हृदयी स्मराचे ॥ ध्रु ।। निगम निखिल साधारण सुलभाहुनि सुलभ बहू । इतर योग याग विषम पथि का शिणावे ।। १।। श्रीगुरुचे चरणकंज ॥धु॥ तरतनु द्रुढ नावेसी बुडवुनी अति मूढपणे । दुष्ट नष्ट कुकर सुकर तनु का फिरावे ।। २।। श्रीगुरुचे चरणकंज ।। ध्रु ।। रामदास विनवी तुज अजून तरी समज उमज । विषय वीष पिउनी बळे फुकट का मरावे ॥ ३॥ श्रीगुरुचे चरणकंज हृदयी स्मरावे ।।

पद

जय बलभीमा नकळे सीमा वेदा तुझा महिमारे । तच गुणकीर्तन गाता स्तविता देसी सुखकर प्रेमारे । जय बलभीमा ॥ १४॥ अंजनी माता तप आचरिता प्रसन्न झाला त्रिपुरारी । स्वयेतिच्या उदरा येउनी अवतरला हा मदनारी जय बलभीमा ।।२।। राम ध्यानी राम चिंतनी सर्वदा । ऐंशा पडदा का न स्मरा जो कपि हारी आपदा जय बलभीमा ।।३।। मारुतिराया शरण जाउनी मागा आपुल्या हिताला । तोची मनोहर एक जनार्दन वंदी त्याच्या पदाला ।। ४।। जय बलभीमा नकळे सीमा वेदा तुझा महिमारे । तव गुणकीर्तन गाता स्तविता देसी सुखकर प्रेमारे । जय बलभीमा

अभंग

आम्ही अपराधी अपराधी आम्हा नाही दृढ बुध्दी ।। ।। आमुचे अपराध अगणित कोण करील गणित ।। २।। मज सर्वस्वी पाळावे प्रचितीने सांभाळावे ।। ३ ।। माझी वाईट करणी रामदास लोटांगणी ।। ४।।

भजन

(गोलाकार फिरुन हे भजन म्हणावे)

सखाराम सीताराम । हे भजन झाल्यावर गुरुंचा जय जय कार करावा.

पुंडलीक वरदे हरी विठ्ठल । पार्वतीपते हरहर महादेव ।।

सीताकांत स्मरण जयजयराम ।।

राजाधिराज रामचंद्र महाराजकी जय ।

गोपाळकृष्णमहाराजकी जय ।।

शुकाचार्य महाराजकी जय ।।

समर्थ रामदासस्वामी महाराजकी जय ।।

सद्गुरुनाथ महाराजकी जय ।।

राघवेंद्रस्वामी महाराजकी जय ।।

सखाराम महाराजकी जय ।।

चित्घनस्वामी महाराजकी जय ।।

रामकृष्ण महाराजकी जय ।

सद्‌गुरु गोविंदराज महाराजकी जय । महारुद्र हनुमानकी जय । हरयेनमः ।। हरयेनमः ।। हरयेनमः ।1 रामदास कल्याण जगन्नाथ महाराजकी जय ।।१३

नामावली

विमल वाचा देरे राम । विमल करणी दे. । प्रसंग ओळखी है। धूर्त कळा मज दे. । हितकारक दे. । जनसुखकारक है। अंतर पारख दे. । बहुजन मैत्री दे० । विद्या वैभव दे । उदासीनता है। मागों नेणें ते दे० । मज न कळे ते दे. । तुझी आवडी है। दास म्हणे ते दे. ।। १।। संगीत गायन दे. । रसाळ मुद्रा थे. । अलाप गोडी दे. । अनेक धाटी दे. । धात मात मज दे । जाडकथा मज दे. । दस्तक टाळी दे. । नृत्यकळा मज दे. ॥ प्रबंध सरळी दे. । शब्द मनोहर दे० । सावधपण मज दे । बहुत पाठांतर दे. । दास म्हणे मज दे० ।। २।। पावन भिक्षा दे । दीन दया मज दे. । अभेद भक्ति दे. । आत्मनिवेदन है । तद्रुपता मज दे. । अर्थारोहण दे. । सज्जन संगती दे । अलिप्तपण मज दे । ब्रह्मानुभव दे. । अनन्य सेवा दे. । मजविण तू मज । दास म्हणे मज दे. ।। ३।।

सीताकांत स्मरण जयजयराम ॥

जयजय केशव, सच्चिदानंदरूप ॥१॥ जयजय नारायण.।। २।। जय जय माधव. । जय जय गोविंद । जयजय विष्णोजय जय मधुसूदन । जयजय त्रिविक्रम. । जयजय. वामनः । जयजय. श्रीधर । जय. । हृषीकेश. । जय पद्मनाभ । जयजय दामोदर । जयजय संकर्षण. । जय. वासुदेव । जय. प्रद्युम्न । जयजय अनिरुध्द । जयजय. पुरुषोत्तम. । जयजय अधोक्षज । जयजय. नारसिंह. । जय . अच्युत । जय. जनार्दन । जय. उपेंद्र । जय. हरे. । जय. हरे. । जय. श्रीकृष्ण । जय. श्रीकृष्ण । चित्घन । सद्गुरुराज महाराजकी जय ।।